Join us  

पारंपरिक पद्धतीने अबोलीने केली गुढीची पूजा; शेअर केले गुढीपाडवा सेलिब्रेशनचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 1:23 PM

1 / 8
सध्या सगळीकडे आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण मोठ्या थाटात गुढीपाडवा सेलिब्रेट करत आहे.
2 / 8
मराठी कलाकारांमध्येही नववर्षाचा उत्साह आहे. त्यामुळे अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या गुढीपाडवा सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
3 / 8
सध्या नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिची चर्चा रंगली आहे.
4 / 8
अबोली मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या गौरीने नुकतंच गुढीपूजन केलं असून यातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 8
गौरीने गुढीला छान गुढीवस्त्र नेसवून पारंपरिक पद्धतीने गुढीपूजन केलं आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6 / 8
गौरी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. स्वभावातील साधेपणा आणि नम्रपणा यांच्या जोरावर तिने लोकप्रियता मिळवली.
7 / 8
गौरी अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.
8 / 8
गौरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात कायम राहण्याचा प्रयत्न करत असते.
टॅग्स :गुढीपाडवासेलिब्रिटीटिव्ही कलाकार