Join us  

एका मेसेजने झाली सुरुवात, आधी मिळाला नकार अन् अशी फुलली अभिजीत-सुखदाची Love Story

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 4:05 PM

1 / 9
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar). त्याने पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांना भुरळ घातली. तरुणी तर या हँडसम, चार्मिंग अभिनेत्याच्या प्रेमातच पडल्या.
2 / 9
या मालिकेने अभिजीतला तर ओळख दिलीच पण एका मुलीशी ओळखही करुन दिली. ती मुलगी म्हणजे सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar). दोघांची नक्की कधी, कशी ओळख झाली, त्यांच्या लव्हस्टोरीला नेमकी कशी सुरुवात झाली बघुया.
3 / 9
अभिजीत मूळचा नाशिकचा आहे. तो आधी रेडिओ जॉकी म्हणून काम करत होता. सोबतच मालिका, सिनेमासाठी तो ऑडिशनही देत होता. महाराष्ट्राचा सुपरस्टार रिएलिटी शोमध्येही त्याने भाग घेतला. तेव्हा त्याचं टॅलेंट पाहून नंतर त्याला 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' ही मालिका मिळाली.
4 / 9
२०१० साली 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' ही मालिका आली. अभिजीत आणि मृणाल दुसानिस हे नवीन चेहरे प्रेक्षकांसमोर आले. त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली.
5 / 9
मालिकेचं यश पाहता अभिजीतचं सर्वचजण भरभरुन कौतुक करायला लागले. तेव्हाच मूळची नाशिकचीच असलेल्या सुखदानेही त्याला मेसेज करत त्याच्या कामाचं कौतुक केलं. बस! हाच मेसेज दोघांसाठी खास ठरला आणि अभिजीतला खऱ्या आयुष्यातरी शमिका मिळाली.
6 / 9
इथूनच त्यांच्यात बोलणं सुरु झालं. दोघंही नाशिकचे असल्याने त्यांचे म्युच्युअल मित्रही होते. दोघांची ओळख वाढली, भेटी वाढल्या. एक दिवस अभिजीतने तिला प्रपोज केलं. सुखदाही लगेच होकार न देता परत एकदा विचार कर असं सांगितलं.
7 / 9
अभिजीत त्याच्या निर्णयावर ठाम होता. नंतर सुखदालाही त्याच्या प्रेमाची जाणीव झाली आणि त्यांनी एकमेकांबद्दल घरी सांगितलं. लगेच काहीच महिन्यात त्यांचा साखरपुडाही झाला. तर २०१३ ला दोघंही लग्नबंधनात अडकले.
8 / 9
या जोडीचे फोटो सोशल मीडिया कायम व्हायरल होत असतात. आज सुखदाच्या वाढदिवसानिमित्त अभिजीतने खास फोटो शेअर करत छान पोस्ट लिहिली आहे.
9 / 9
2014 साली आलेल्या 'घरकुल' मालिकेत अभिजीत आणि सुखदाने एकत्र काम केलं. यानंतर ही जोडी परत एकत्र दिसली नाही. अभिजीतची 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिकाही सुपरहिट झाली तर सुखदाने 'बाजीराव मस्तानी' मधून बॉलिवूडमध्ये काम केलं.
टॅग्स :अभिजीत खांडकेकरमराठी अभिनेतासुखदा खांडकेकरदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट