Join us  

ही तर मलायकाचीच कॉपी ! मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 3:32 PM

1 / 9
बॉलिवूडची सर्वात बोल्ड आणि फिट अभिनेत्री म्हणून मलायका अरोरा कडे पाहिले जाते. मलायका वरुनच नजरा हटत नसताना आता तर तिच्या ड्युप्लिकेटची सोशल मीडियावर चर्चा आहे
2 / 9
सोशल मीडियावर नेहमीच हुबेहुब कलाकारांसारख्या दिसणाऱ्यांचे फोटो व्हायरल होत असतात. आता मलायका अरोराचीही ड्युप्लिकेट व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे मलायका अरोराची ही ड्युप्लिकेट मराठी अभिनेत्री आहे.
3 / 9
अभिनेत्री हीना पांचालला मराठीतील मलायका अरोरा म्हणले जाते. तिचे सोशल मीडियावरचे फोटो बघितले तर ही मलायकासारखी का दिसतेय असे वाटेल. हीना चा फिटनेस अगदी मलायकासारखाच आहे
4 / 9
हीनाने देखील सोशल मीडियावर खूपच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. प्रत्येक फोटोत मलायकाचीच झलक दिसून येते. फोटो पाहून तुम्ही देखील नक्कीच गोँधळात पडू शकता की ही मलायका तर नाही ना
5 / 9
हीना बिग बॉस मराठी २ मध्ये सहभागी झाली होती. याच शोमधून तिला प्रसिद्धी मिळाली. हिनानं दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे.
6 / 9
हीनाची तुलना नेहमीच मलायकाशी केली जाते. तिने कोणताही फोटो पोस्ट केला की लगेच मलायकासारखई दिसत आहे असे म्हणले जाते.
7 / 9
हीना पारस छाबरा आणि शहनाझ गिलच्या मुझसे शादी करोगी शो मध्ये सुद्धा आली होती. यामध्ये पारस आणि हीनाची केमिस्ट्री बघायला मिळाली होती.
8 / 9
हीना चे बोल्ड फोटो पाहून तिच्या फॉलोअर्समध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या तिचे इन्स्टाग्रामवर ५ लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत.
9 / 9
टॅग्स :व्हायरल फोटोज्हिना पांचाळमलायका अरोरासोशल मीडिया