Join us  

महेश बाबूच्या भावाला चप्पलने केली होती मारहाण; हॉटेलमध्ये परस्त्रीसोबत असताना पत्नीने पकडलं होते रंगेहाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 12:06 PM

1 / 6
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू कायम त्याच्या दमदार अभिनयामुळे आणि चित्रपटामुळे चर्चेत येत असतो. मात्र,यावेळी तो त्याच्या सावत्र भावामुळे चर्चेत येत आहे. महेश बाबूचा मोठा भाऊ नरेश बाबू याचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ पोस्ट व्हायरल झालाय. यात तो लिप लॉक करताना दिसतोय. नरेश बाबू हा सुद्धा अभिनेता आहे
2 / 6
नरेश बाबूने आपल्या चौथ्या लग्नाची घोषणा केली आहे.. गेल्या काही दिवसांपासून तो आणि कन्नड अभिनेत्री पवित्रा लोकेश ( Pavitra Lokesh) यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. आता हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
3 / 6
महेश बाबूचा भाऊ नरेश बाबू याने यापूर्वी तीन विवाह केले असून त्यांची तीनही लग्ने मोडली आहेत. नरेश बाबू आणि त्यांची तिसरी पत्नी राम्या रघुपती त्यांच्यात अनेक वाद झाले आहेत. पत्नीसोबत पटत नसल्यामुळे नरेश बाबू गेल्या काही दिवसांपासून हॉटेलमध्ये राहात होता. कन्नड अभिनेत्री पवित्रा लोकेश घाटमानेनी कुटुंबासोबत अनेकदा दिसल्या आहेत.
4 / 6
इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पवित्रा लोकेश या महेश बाबूचा शेवटचा चित्रपट 'सरकार वारी पाता' मध्ये त्याच्या आईची भूमिका साकारली होती, ज्यात कीर्ती सुरेशची भूमिका होती. एवढेच नाही तर नरेशला त्याची तिसरी पत्नी रम्या रघुपती हिने हॉटेलमध्ये रंगेहात पकडले. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आली.
5 / 6
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नरेशची पत्नी रम्याने त्याला चप्पलने मारहाण केल्याचे दिसून आले. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पवित्रा लोकेशने नरेशने आपल्या पत्नीची फसवणूक केल्याच्या बातम्यांचे खंडन केले आणि रम्याला खोटारडे म्हटले. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये परस्त्रीसोबत नरेश बाबू यांना पाहिल्यानंतर राम्या यांनी राग अनावर झाला आणि त्यांनी त्याच क्षणी पतीला चप्पलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी आरडाओरडा करुन या हॉटेलमध्ये गोंधळ माजवला. परिणामी, पोलिसांनी घटनास्थळावर जात राम्या यांना आडवलं.
6 / 6
विजया कृष्ण नरेश असं नरेशबाबूचं पूर्ण नाव आहे. अभिनेता, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता अशी त्याची ओळख आहे. 1970 साली बालकलाकार म्हणून त्याने अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली. त्याने सुमारे 200 चित्रपटांत काम केलं. नरेश बाबू हा महेश बाबूचा सावत्र भाऊ आहे. नरेश हा दिवंगत अभिनेत्री विजया निर्मला यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. परंतु, पतीच्या निधनानंतर विजया यांनी अभिनेता कृष्णा यांच्याशी लग्न केलं. महेश बाबू, विजया आणि कृष्णा यांचा मुलगा आहे.
टॅग्स :महेश बाबूTollywood