Join us  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचा मालदीव्समध्ये रोमँटिक अंदाज; नवऱ्याबरोबरचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 4:48 PM

1 / 9
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या शोमुळे अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. हास्यजत्रेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे चेतना भट.
2 / 9
चेतना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या ती नवऱ्यासोबत मालदीव्समध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
3 / 9
चेतनाने मालदीव्स व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये चेतनाने पांढऱ्या रंगाचा वनपीस घालत फॅशन केली आहे.
4 / 9
नवऱ्याबरोबर चेतनाने रोमँटिक पोझ दिल्या आहेत. चेतनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
5 / 9
चेतनाच्या या फोटोंवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. गायिका वैशाली सामंतने केलेल्या कमेंटने लक्ष वेधून घेतलं आहे.
6 / 9
'काय खरं नाई मालदीव्सचं' अशी कमेंट वैशाली सामंतने चेतनाच्या फोटोंवर केली आहे.
7 / 9
चेतनाप्रमाणेच तिचा नवरादेखील कलाविश्वातच काम करतो. तिच्या नवऱ्याचं नाव मंदार चोळकर आहे.
8 / 9
मंदार हा प्रसिद्ध गीतकार आहे. अनेक मराठी सिनेमांसाठी त्याने काम केलं आहे.
9 / 9
चेतनाही गेल्या अनेक वर्षांपासून मराठी कलाविश्वात कार्यरत आहे. 'अलमोस्ट सफळ संपूर्ण' या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमालदीव