Join us  

मीम्स की दुनिया...! प्राजक्ता माळीनं शेअर केले स्वतःचेच भन्नाट मीम्स, पाहून आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 2:58 PM

1 / 9
मीम्स पाहताना अनेकांना हसू आवरत नाही. स्वत:वरचे मीम्स एन्जॉय करणारेही इथे अनेकजण आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी यापैकीच एक.
2 / 9
सोशल मीडियावरचे भन्नाट मीम्स म्हणजे आणखी एक मनोरंजन. होय, हे मीम्स पाहताना अनेकांना हसू आवरत नाही. स्वत:वरचे मीम्स एन्जॉय करणारेही इथे अनेकजण आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी यापैकीच एक.
3 / 9
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्यानं चाहत्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यावरचे मीम्स पाहून अनेकांना हसू आवरत नाही. प्राजक्ता माळीची स्थितीही वेगळी नाही.
4 / 9
होय, खुद्द प्राजक्ताने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर स्वत:वरचे काही भन्नाट व मजेशीर मीम्स शेअर केले आहेत. तिचे हे मीम्स सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
5 / 9
मीम्स की दुनिया...खूप दिवसानंतर...सर्वांना प्रेम, असं कॅप्शन देत प्राजक्ताने स्वत:वरचे काही मीम्स शेअर केले आहेत.
6 / 9
हे मीम्स इतके भन्नाट आहेत की, हसून हसून पोट दुखेल. पहिलं मीम तर भन्नाट आहे. यानंतरचे अनेक मीम्सही तितकेच मजेशीर आहेत.
7 / 9
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ता माळीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य, दिलकश अदा आणि लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ता अल्पावधीतच रसिकांची आवडती अभिनेत्री बनलीये.
8 / 9
प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. चित्रीकरणाच्या वेळेसचे फोटो, व्हॅकेशनचे फोटो प्राजक्ता सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
9 / 9
मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
टॅग्स :प्राजक्ता माळीमिम्स