Join us  

memes viral : ललित मोदी-सुश्मिता सेनच्या ब्रेकअपची चर्चा ऐकून नेटकरी ‘सैराट’, सोशल मीडियावर मीम्सचा पूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 3:36 PM

1 / 10
सुश्मिता सेन व ललित मोदींच्या डेटींगची बातमी ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण आता दोघांच्या ब्रेकअपची चर्चा आहे. अशात सोशल मीडिया गप्प कसा बसणार? सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय.
2 / 10
होय, सुश्मिताला ‘बेटर हाफ’बनवण्याचं ललित मोदींचं स्वप्न भंगलं आहे. चर्चा खरी मानाल तर ललित मोदी व सुश्मिता यांचं ब्रेकअप झालं आहे. यावरचे एकापेक्षा एक भन्नाट मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
3 / 10
ललित मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या एका बदलामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता ललित मोदींनी डीपी व बायोमधून सुश्मिताचं नाव हटवलं आहे. यावरून नेटकरी ललित मोदींची चांगलीच मजा घेत आहेत.
4 / 10
सुश्मितासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केल्यानंतर मोदींनी आपल्या इन्स्टाग्राम बायोमध्ये अभिनेत्रीला आपली ‘बेटरहाफ’ म्हणत एक मोठी पोस्ट लिहिली होती. सोबत डीपीमध्येही सुश्मितासोबतचा फोटो लावला होता.
5 / 10
आता ललित मोदींनी डीपी व बायोमधून सुश्मिताचं नाव हटवलं आहे. यावरुनच त्या दोघांचं काही तरी बिनसलं असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे आणि ही चर्चा ऐकून नेटकरी ‘सैराट’ झाले आहेत.
6 / 10
ललित मोदींनी 15 जुलैला सुश्मितासोबतचा फोटो लावला होता. शिवाय बायोमध्ये सुश्मिताला ‘पार्टनर इन क्राईम’ आणि ‘माय लव्ह‘ म्हणून संबोधित केलं होतं. पण दीडच महिन्यात सगळं बदललं.
7 / 10
दीड महिना होत नाही तोच आता ललित मोदींनी प्रोफाईल व इन्स्टा बायोमधून सुश्मितासोबतचा फोटो हटवला आहे. नव्या प्रोफाईलमध्ये आता मोदींनी स्वत:चा हसरा फोटो लावला आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये आयपीएल लिहिलं आहे.
8 / 10
तेरा काम हो गया, तू जा... अशा आशयाचं एक मीम पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
9 / 10
ललित मोदी कदाचित ब्रेकअपमुळे दु:खी असतील पण नेटकरी जोमात आहेत. ये तो सच है की भगवान है, अशा आशयाचं भन्नाट मीम सध्या व्हायरल होतंय.
10 / 10
बहुत तकलीफ होती है, जब आप योग्य हो और लोग आपकी योग्ता न पहचाने, असं एक मीम शेअर करत नेटकरी ललित मोदींची मजा घेत आहेत.
टॅग्स :ललित मोदीसुश्मिता सेनमिम्ससोशल मीडिया