Join us  

एजाज करतोय 10 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला डेट; एकेकाळी केली होती अनिता हंसनंदानीची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 11:59 AM

1 / 10
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणजे एजाज खान. अनेक मालिकांमध्ये झळकलेला एजाज आज कोणासाठीही नवीन नाही.
2 / 10
१९९९ मध्ये तक्षक या चित्रपटातून एजाजने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं.
3 / 10
'कुछ ना कहो', 'जस्ट मॅरिड', 'तनु वेड्स मनू', 'जिला गाजियाबाद', 'तनु वेड्स मनू रिटर्न्स' या चित्रपटांमध्ये तो झळकला आहे.
4 / 10
बॉलिवूडमध्ये नाव कमावलेला एजाज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेतादेखील आहे. त्याने 'कुसुम', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कोई दिल में है', 'केसर', 'कसौटी जिंदगी के', 'काव्यांजलि', 'कुमकुम-प्यारा सा बंधन', 'कसम से', 'कयामत', 'लव ने मिला दी जोड़ी', 'दिया और बाती' या सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
5 / 10
बिग बॉस 14 या शोच्या माध्यमातून एजाज विशेष चर्चेत आला. या शोमध्ये त्याने त्याच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफविषयीदेखील अनेक खुलासे केले.
6 / 10
आज एजाज त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत असून सोशल मीडियावर त्याची लव्ह लाइफ चर्चेत आली आहे.
7 / 10
एकेकाळी एजाज प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अनिता हंसनंदानीला डेट करत होता. मात्र, काही कारणास्तव ही जोडी विभक्त झाली. एका मुलाखतीत अनिताने याविषयी भाष्य केलं होतं.
8 / 10
काव्यांजली या मालिकेदरम्यान एजाज-अनिता यांचं सूत जुळलं होतं. मात्र, दीड वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ते विभक्त झाले.
9 / 10
सध्या एजाज त्याच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला डेट करत आहे.
10 / 10
एजाज अभिनेत्री पवित्रा पुनियाला डेट करत आहेत. बिग बॉसपासून या दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीअनिता हसनंदानीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार