Join us  

'करिश्मा का करिश्मा' फेम अभिनेत्रीमध्ये झालाय कमालीचा बदल; आता तिला ओळखणं म्हणजे जणू टास्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 2:32 PM

1 / 10
आज प्रत्येक सिनेमा, मालिकांमध्ये कलाकारांसोबतच बालकलाकारही पाहायला मिळतात. यात सध्या असे काही बालकलाकार आहेत जे मोठे झाले आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे झनक शुक्ला.
2 / 10
करिश्मा का करिश्मा या मालिकेतील झनक सगळ्यांच्याच लक्षात असेल. बालकलाकार असलेल्या झनकने त्यावेळी या मालिकेत एका रोबोटची भूमिका केली होती.
3 / 10
९० च्या दशकात ही मालिका खूप गाजली होती. विशेष म्हणजे तिने रोबोटची भूमिका उत्तमरित्या साकारली होती.
4 / 10
झनक आता मोठी झाली असून ती कलाविश्वापासून दूर गेली आहे. त्यामुळे ती कशी दिसते, काय करते असे प्रश्न चाहत्यांना पडतात.
5 / 10
कलाविश्वापासून दूर गेलेली झनक सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.
6 / 10
झनकमध्ये आता कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे तिला ओळखणं सुद्धा कठीण झालं आहे.
7 / 10
झनकला नवनवीन ठिकाणांना भेट देणं, भटकंती करणं विशेष आवडतं. त्यामुळे ती कायम नवीन ठिकाणी फिरताना दिसते.
8 / 10
झनकला कधीच इंडस्ट्रीत काम करायचं नव्हतं. तिला कायम अभिनेत्री सोडून अन्य क्षेत्रात काम करायचं होतं. यात तिला सामाजिक कार्य करायला जास्त आवडतं असं तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
9 / 10
झनकची आई टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिध्द अभिनेत्री आहे. सुप्रिया शुक्ला असे तिच्या आईचे नाव आहे. त्यामुळे बालपणापासून अभिनयाचे बाळकडू झनकला आईकडूनच मिळाले.
10 / 10
सुप्रिया शुक्ला 'कुमकुम भाग्य' मालिकेत आणि 'मै हुँ हिरो तेरा' सिनेमातही झळकल्या आहेत.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारझनक शुक्ला