Join us
Daily Top 2Weekly Top 5

Taimur : बापरे! ट्यूशनला जाणाऱ्या तैमूरचा ५० जणांनी केला पाठलाग; सैफ अली खानला कळताच त्याने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 12:29 IST

1 / 10
अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा लाडका लेक तैमुर अली खानची नेहमीच चर्चा रंगलेली असते. एक काळ असा होता जेव्हा तैमूरची लोकांमध्ये खूप क्रेझ होती. फोटोग्राफर देखील फोटोसाठी त्याच्या मागे असायचे.
2 / 10
वरिंदर चावला यांनी यावर आता खुलासा केला आहे. 'एक वेळ अशी होती जेव्हा तैमूरबाबत एक पोस्ट केली नाही तर फॉलोअर्स लगेचच नाराज व्हायचे.'
3 / 10
'करीना कपूरची एक चांगली गोष्ट म्हणजे ती कधीच पॅप्सला नाही म्हणत नाही. त्यावेळी कॅमेरामनवर इतकं प्रेशर असायचं की ते करीनाच्या घराबाहेरच उभे असायचे.'
4 / 10
'आम्हाला तैमूरबाबत खूप मेसेज मिळायचे. डिमांड वाढली होती, त्यामुळे आम्ही तरी काय करणार. २४ तास त्याच्या पाठीमागे राहणं सुरू केलं होतं.'
5 / 10
'तो शाळेत जात असताना आम्ही त्याच्या मागे जायचो, ट्यूशनला जायचा तेव्हा ट्यूशनला जायतो. खेळतानाही आम्ही त्याचा पाठलाग करायचो. आम्ही त्या मुलाचं पर्सनल आयुष्य डिस्टर्ब केलं होतं.'
6 / 10
'सैफ-करीनाने तेव्हा विनंती केली की, तुम्ही काही ठिकाणी येऊ नका. शाळा किंवा ट्यूशनसारख्या ठिकाणी येऊ नका. एकदा मी बाहेर होतो आणि मी तैमूरला पाहिलं, तो ट्यूशनला जात होता.'
7 / 10
'माझ्या लक्षात आले की ४०-५० लोक त्याच्या मागे बाईकवरून येत होते. मी हादरलो. मग कोणीतरी म्हटलं पुढचा तमाशा पाहा. कोणी गेटवर चढलं, कोणी गाडीला घेरलं, जसं काही अटॅकच करणार होते.'
8 / 10
'मी घाबरलो आणि मला वाटलं की यार हे चुकीचं आहे. जर मी इतका घाबरलो तर कुटुंबाला काय त्रास झाला असेल याची कल्पना करा. सैफने फोन करून असं करू नका असं सांगितलं.'
9 / 10
'मग मी ठरवलं की आता मी कोणत्याही स्टारच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप करणार नाही. बाऊंड्री सेट करणं गरजेचं आहे' असं म्हटलं आहे.
10 / 10
टॅग्स :तैमुरसैफ अली खान करिना कपूर