Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PICS : कंगना राणौतच्या भावाच्या लग्नाचा थाट, असे केले नव्या सुनेचे स्वागत

By रूपाली मुधोळकर | Updated: November 12, 2020 15:44 IST

1 / 11
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा भाऊ अक्षत राणौत याचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2 / 11
कंगनाने आपल्या भावाच्या नववधूचे दणक्यात स्वागतही केले. आमच्या कुटुंबात तुझे स्वागत ऋतु, असे लिहित कंगनाने नवदांम्पत्यासोबतचे काही फोटो शेअर केलेत.
3 / 11
भावाच्या लग्नात कंगनाने पर्पल व ग्रीन कलरचा लहंगा घातला होता.
4 / 11
राजस्थानच्या उदयपूर येथे कंगनाच्या भावाचे शाही लग्न झाले. या लग्नाचा थाट पाहण्यासारखा होता.
5 / 11
अक्षत आणि ऋतुचे लग्न राजस्थानी थीमवर पार पडले. यानिमित्ताने वर आणि वधूचे कुटुंब 10 नोव्हेंबर रोजी उदयपुरला पोहोचले होते. लग्नाचे कार्यक्रम 2 दिवस चालले.
6 / 11
बुधवारी हळद व संगीतनंतर अक्षत आणि ऋतु गुरुवारी सकाळी लग्नाच्या बेडीत अडकले. संध्याकाळी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले.
7 / 11
कोरोनामुळे लग्नाचा सोहळा छोटेखानी ठेवण्यात आला. परंतु उत्साह तोच होता.
8 / 11
भावाच्या लग्नात कंगनाने धम्माल मज्जा केली. यावेळी तिने धम्माल डान्सही केला.
9 / 11
तिच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
10 / 11
मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीला 10 नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण भावाच्या लग्नात व्यस्त असल्याचे कारण देत तिने मुंबईला जाण्याचं टाळलं आहे.
11 / 11
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ती ‘थलायवी’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. या सिनेमात ती तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. यानंतर ‘तेजस’ या सिनेमात तिची वर्णी लागली आहे.
टॅग्स :कंगना राणौत