Join us  

'कभी खुशी कभी गम' रिलीजवेळी काजोलचा झाला होता दुसरा गर्भपात? म्हणाली, "त्या दिवशी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 10:56 AM

1 / 7
अभिनेत्री काजोल (Kajol) बॉलिवूडमधील सर्वात आघाडीची अभिनेत्री. ९० च्या दशकात तिची चुलबुली गर्ल म्हणून ओळख झाली होती. काजोलचा सहज सुंदर अभिनय प्रेक्षकांना प्रेमात पाडणारा आहे. कुछ कुछ होता है मध्ये साकारलेली अंजली असो किंवा गुप्त सिनेमातील निगेटिव्ह पात्र काजोलने सर्वच भूमिका ताकदीने निभावल्या.
2 / 7
गेल्या तीन दशकांपासून काजोल इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. अजय देवगणसोबत लग्न, नंतर दोन मुलं यानंतर आजही तिचा अभिनय मात्र टिकून आहे. १९९२ साली तिने 'बेखुदी' सिनेमातून पदार्पण केले होते. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे','बाजीगर','कभी खुशी कभी गम','फना' असे एकापेक्षा एक अनेक सुपरहिट सिनेमे तिने दिले. तिच्या चित्रपटांची यादी प्रचंड मोठी आहे.
3 / 7
काजोल आणि अजय देवगण एकमेकांच्या अगदीच विरुद्ध आहेत. त्यांचा स्वभाव खूपच वेगळा आहे. काजोल अगदीच बडबडी तर अजय प्रचंड शांत आहे. एका सिनेमाच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. तेव्हा पहिल्या भेटीत दोघांनी एकमेकांना नापसंत केलं होतं. मात्र नंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि प्रेमही झाले
4 / 7
दोघंही ४ वर्ष एकमेकांना डेट करत होते. जेव्हा त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा काजोलच्या घरातून विरोध होता. काजोलच्या वडिलांनी ४ दिवस तिच्याशी अबोला धरला होता. मात्र त्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे पाहून काजोलच्या घरातून लग्नाला होकार मिळाला.
5 / 7
काजोल आणि अजय यांचं लग्न दोन पद्धतीने झालं. पंजाबी आणि मराठी पद्धतीने त्यांनी लग्न केलं. लग्नाचा दिवस खास असतो म्हणून त्यांनी मीडियाला चुकीचा पत्ता दिला होता. फेरे घेताना अजयने भटजींना लवकर लग्न लावा म्हणून पैसे देण्याचा प्रयत्न केला होता.
6 / 7
काजोलचा दोन वेळेस गर्भपात झाला आहे. 'कभी खुशी कभी गम' वेळेस ती प्रेग्नंट होती मात्र रिलीज आधीच तिचे मिसकॅरेज झाले. त्या दिवशी ती रुग्णालयात होती. सिनेमा हिट झाला मात्र काजोलच्या वैयक्तिक आयुष्यात तिला मोठं दु:ख पचवावं लागलं. काही वर्षांनी त्यांना काजोलने नीसा आणि युग दोघांना जन्म दिला. तेव्हा कुटुंब पूर्ण झाल्याचा आनंद तिने व्यक्त केला होता.
7 / 7
काजोलने एकदा स्मरणशक्तीही गमावली होती. होय, 'कुछ कुछ होता है'चं शूट करत असताना काजोल सायकलवरुन पडली. यानंतर ती बराच वेळ बेशुद्ध होती.शुद्धीत आल्यानंतर काही दिवस तिने स्मरणशक्तीच गमावली होती. ती खूप रडली कारण तिला काहीच आठवत नव्हतं. अगदी अजय देवगणलाही ती ओळखत नव्हती. असे एक ना अनेक किस्से काजोलच्या आयुष्यात घडले आहेत.
टॅग्स :काजोलबॉलिवूडप्रेग्नंसीअजय देवगण