Join us  

शिव ठाकरे ते कॉमेडियन राजीव ठाकूरपर्यंत; 'झलक दिखला जा 11' स्पर्धकांची संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 1:26 PM

1 / 10
‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ नंतर शिव ठाकरे आता 'झलक दिखला जा सिझन 11' मध्ये दिसेल. शिवने त्याच्या करिअरची सुरूवात डान्सपासून केली होती. आता 'झलक दिखला जा सिझन ११' मंच तो गाजवणार आहे. त्याचा कोरिओग्राफर रोमेश सिंह असेल.
2 / 10
'ससुराल सिमर का’ फेम शोएब इब्राहिम 'झलक दिखला जा सिझन 11' आपल्या डान्स मूव्ह्स दाखवण्यासाठी सज्ज आहे. तो शेवटचा 'अजुनी'मध्ये दिसला होता. कोरिओग्राफर अनुराधा अय्यंगरसोबत तो थिरकणार आहे.
3 / 10
उर्वशी ढोलकिया ही नागिन 6 मध्ये चाहत्यांना पाहायला मिळाली होती. ती पुन्हा एकदा 'झलक दिखला जा सिझन 11' मध्ये सहभागी होऊन पडद्यावर जादू पसरवण्यासाठी सज्ज आहे. या अभिनेत्रीने 'बिग बॉस 6' आणि 'नच बलिए 9' सारखे अनेक रिअॅलिटी शो याआधी केले आहेत. उर्वशी ढोलकिया लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक वैभव गुगे सोबत मंच गाजवणार आहे.
4 / 10
कॉमेडियन राजीव ठाकूरने द कपिल शर्मा शोमधून चाहत्यांचे मनोरजंन केले होते. तो 'झलक दिखला जा 11' च्या निश्चित स्पर्धकांपैकी एक आहे. 15 वर्षांपासून कॉमेडी शो करत असलेला राजीव या डान्स रिअॅलिटी शोमध्ये एका नव्या अवतारात दिसणार आहे.
5 / 10
नुकतेच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात आणि 'खतरों के खिलाडी 13' मध्ये दिसलेली लोकप्रिय अभिनेत्री अंजली आनंद आता 'झलक दिखला जा 11' मध्ये पाहायला मिळणार आहे. डान्स मूव्हीज दाखवून मन जिंकण्यासाठी ती सज्ज आहे.
6 / 10
करुणा पांडे ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'पुष्पा इम्पॉसिबल' या शोमध्ये पुष्पाची मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरजंन करत आहे.
7 / 10
आमिर अली शेवटचा 'द ट्रायल'मध्ये दिसला होता. आता तो 'झलक दिखला जा 11'च्या मंचावर थिरकायला सज्ज आहे. त्याचा कोरिओग्राफर स्नेहा सिंह असणार आहे.
8 / 10
अदरीजा सिन्हा हिने मनोज बाजपेयींच्या बंदा या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले आहे. ती देखील या शोचा भाग असेल. नुकतीच ती 'स्कूल ऑफ लाईज' या वेब शोमध्ये दिसली होती.
9 / 10
बॉलिवूड अभिनेत्री आणि काजोलची बहीण तनिषा मुखर्जी बिग बॉस 7 मध्ये दिसली होती. आता ती आता डान्स रिअॅलिटी शोमध्ये काम करून टेलिव्हिजनवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तनिषा मुखर्जीचे नृत्यदिग्दर्शक तरुण राज निहलानी आहेत.
10 / 10
स्पोर्ट्स स्टार संगीता फोगट डान्स शोद्वारे रिअॅलिटी शोमध्ये पदार्पण करणार आहे. संगीता ही लोकप्रिय कुस्तीपटू गीता फोगट आणि बबिता फोगट यांची धाकटी बहीण आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनशीव ठाकरेअंजली आनंदउर्वशी ढोलकिया