1 / 9हुमा कुरेशी सध्या जाम चर्चेत आहे. होय, अगदी प्रोफेशनल आणि पर्सनल अशा दोन्ही ठिकाणी तिचे कौतुक होतेय. एकीकडे हुमाने कोरोना रूग्णांसाठी 100 बेडचे रूग्णालय उभारले. दुसरीकडे तिची ‘महारानी’ही वेबसीरिज चर्चेत आहे.2 / 9होय, ‘महारानी’ ही सीरिज बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे मानले जातेय.3 / 9याच सीरिजच्या निमित्ताने हुमाने नवभारत टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत हुमा जे काही बोलली ते ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.4 / 9होय, तू रिअल लाईफमध्ये खरोखर मुख्यमंत्री बनलीस तर काय? असे विचारले असता, मी खरंच मुख्यमंत्री बनले तर याला एक वाईट स्वप्न मानून झोपी जाईल. कारण राजकारण माझ्या समजण्यापलीकडचे आहे. मला यातले काहीही कळत नाही, असे ती म्हणाली.5 / 9‘महारानी’तील भूमिकेबद्दलही ती बोलली. ही भूमिका माझ्या आयुष्यातील सर्वात अवघड भूमिका होती. पण ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली, याचे समाधान कैक पटींनी मोठे आहे, असे ती म्हणाली.6 / 9‘गँग आॅफ वासेपूर 2’मधून अभिनेत्री हुमा कुरेशीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 7 / 9हुमाने आत्तापर्यंत एक थी डायन,लव शव ते चिकन खुराना,बदलापूर2, आणि जॉली एलएलबी2 अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. 8 / 9 करण शर्मा यांचे दिग्दर्शन आणि सुभाष कपूर यांची निर्मिती असलेल्या ‘महारानी’मध्ये सोहम शाह, अमित सियाल व विनीत कुमार प्रमुख भूमिकेत आहेत. 9 / 9नरेन कुमार व डिम्पल खरबंदा यांची निर्मिती असलेली ‘महारानी’ ही काल्पनिक सीरिज आहे.