Join us  

Then And Now: प्राजू, प्रिया, हृता... तुमच्या आवडत्या अभिनेत्री आधी अशा दिसायच्या...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 8:00 AM

1 / 9
सर्वांची लाडकी प्राजू अर्थात प्राजक्ता माळीचे आधीचे फोटो बघून हीच ती यावर तुमचा विश्वास बसणार नाही. आत्ता ती प्रचंड ग्लॅमरस दिसू लागली आहे.
2 / 9
‘तुझी माझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे अपार लोकप्रिय झालेल्या प्रार्थना बेहरेचा तेव्हाचा आणि आत्ताचा हा फोटो पाहा. आश्चर्याचा धक्का बसला ना?
3 / 9
‘तुझ्यात जीव रंगला’च्या पाठकबाई अर्थात अक्षया देवधर ही तिच्या पहिल्या मालिकेवेळी अशी दिसायची. आत्ता तिला बघात तर बघतच राहाल...
4 / 9
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकर हिने पहिलं फोटोशूट केलं तेव्हाचा हा जुना फोटो. आत्ता बघा ती किती बदलली....
5 / 9
‘होणार सून मी या घरची’ मधून घराघरात पोहोचलेली तेजश्री प्रधान हिचे हे फोटो बघा. तेव्हाची तेजश्री आणि आत्ताची तेजश्री. झाला ना ओळखू न येण्याइतका बदल?
6 / 9
‘कुंकू’ या मालिकेमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली मृण्मयी देशपांडे हिचा तेव्हाचा आणि आत्ताचा हा फोटो बघा.
7 / 9
अंकिता लोखंडे हिची ‘पवित्रा रिश्ता’ ही मालिका तुफान गाजली. तेव्हाच्या आणि आताच्या अंकिता मध्ये बराच बदल झाला आहे. फोटोत तो स्पष्ट दिसतोय.
8 / 9
‘आई कुठे काय करते’ मालिकेत संजना साकारणारी रूपाली भोसलेचे तेव्हाचे फोटो पाहाल तर विश्वास बसणार नाही. आत्ता ती बरीच बदलली आहे.
9 / 9
प्रिया बापट हिने चित्रपटातून बालकलाकार म्हणूनही काम केले होते. संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई एमएमबीबीएस’ मध्ये प्रिया बापटची छोटी भूमिकाही लक्षात राहणारी ठरली. ती सुद्धा खूप बदललीये.
टॅग्स :मराठी अभिनेताऋता दूर्गुळेप्राजक्ता माळीप्रिया बापटप्रार्थना बेहरे