1 / 9 हृतिक रोशनने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून डेब्यू केला आणि बॉलिवूडचा सुपरस्टार बनला. हृतिकच्या या डेब्यू सिनेमाने प्रेक्षकांना असे काही वेड लावले की, सगळ्या वयोगटातील लोक त्याचे चाहते बनले. आता हृतिकच्या पाठोपाठ रोशन कुटुंबातील आणखी एक व्यक्ती बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहे. 2 / 9होय, हृतिकचे काका राजेश रोशन यांची मुलगी पश्मिना रोशन लवकरच बॉलिवूड डेब्यू करू शकते. कालच हृतिकने पश्मिनाच्या डेब्यूची घोषणा केली होती.3 / 9 हृतिकने स्वत: आपल्या या लहान बहिणीला गाईड केले. 4 / 9हृतिक व पश्मिना एकमेकांच्या क्लोज आहे. यामुळे आपल्या बहिणीला त्याने स्वत: ट्रेनिंग दिले. सौंदर्याच्या बाबतीत पश्मिना इतर अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.5 / 9सारा, जान्हवी, अनन्या यांनाही ती मात देऊ शकते. तिने बेरी जॉन अॅॅक्टिंग स्कूलमधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत.6 / 9बी-टाऊनमध्ये पदार्पण करणारी ती रोशन कुटुंबाच्या तिस-या पिढीची सदस्य असेल.7 / 9पश्मिनाचे वडिल राजेश रोशन हे हृतिकचे बाबा राकेश रोशन यांचे धाकटे भाऊ आहेत. राजेश रोशन यांचे संगीतक्षेत्रात मोठे नाव आहे. 8 / 9राजेश रोशन, राकेश रोशन व हृतिक रोशन या तिघांनी कहो ना प्यार है, क्रिश, क्रिश 3, काबिल अशा सिनेमात एकत्र काम केले आहे.9 / 9पश्मिनाने थिएटर डेब्यू केला, तेव्हा हृतिकने तिची भरभरून प्रशंसा केली होती.