Join us  

बाबो..! हॉलिवूडचा हा अभिनेता तीन वाक्यांनी स्त्रियांना अडकवायचा प्रेमाच्या जाळ्यात, ही आहेत ती तीन वाक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 8:00 AM

1 / 10
हॉलिवूडचा ऑस्कर विजेता अभिनेता गॅरी कूपर अभिनयाशिवाय अफेअरमुळे नेहमी चर्चेत असायचा.
2 / 10
गॅरी कूपरचे त्याच्या कारकीर्दीत त्याचे नाव प्रत्येक अभिनेत्रीसोबत जोडले गेले आणि त्याने कधीच ही गोष्ट लपवली नाही.
3 / 10
गॅरीला या गोष्टीचा फार अभिमान वाटायचा. त्याचे व्यक्तिमत्त्वच असे होते की स्त्रिया स्वत:हून त्याच्याकडे आकर्षित व्हायच्या.
4 / 10
मीडिया रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार खुद्द गॅरी कुपरने हे कबूल केले होते की केवळ तीन वाक्य बोलून तो कोणत्याही स्त्रीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा. त्याने असा दावा केला होता की त्याने ही ट्रीक वापरताच स्त्रिया त्यांच्या मनातील सर्व गोष्टी त्याच्याजवळ बोलायच्या आणि त्या त्याला आपल्या जवळचा व्यक्ती समजू लागायच्या. मग त्या त्याच्या प्रेमात पडायच्या.
5 / 10
काय म्हणतेस... No way, खरंच? (Really), मी तर पहिल्यांदाच हे ऐकतोय (this is my first time hearing this) हीच ती तीन वाक्यं जी ऐकीन गॅरी कूपर स्त्रियांना भुरळ पाडायचा. 
6 / 10
मात्र असे असले तरी तो अनेकदा अडचणीत सापडला आहे. प्रत्येक सह अभिनेत्रीसोबत रिलेशनशीप आणि मग काही दिवसांनंतर ब्रेकअप मग दुसऱ्या स्त्रियांच्या शोधात राहणे यामुळे त्याची इमेज खराब झाली.
7 / 10
गॅरीला जरी यात काही गैर वाटत नसले तरी ज्या स्त्रिया त्यांच्या संपर्कात येत असत त्यांच्या मनावर मोठा परिणाम व्हायचा.
8 / 10
गॅरी कूपरचे अनेक स्त्रियांसोबत संबंध होते पण त्याने एकदा लग्न सुद्धा केले होते.
9 / 10
परंतु लग्न झाल्यावरही त्याची सवय काही सुटली नाही आणि शेवटी त्याचा घटस्फोट झाला.
10 / 10
टॅग्स :हॉलिवूड