Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टीव्ह जॉब्स यांची लेक इव जॉब्सने मॉडेलिंगमध्ये केला डेब्यू, पाहा फोटो

By रूपाली मुधोळकर | Updated: December 9, 2020 12:45 IST

1 / 10
स्टीव्ह जॉब्स हे टेक्नॉलॉजी क्षेत्रातील जगभरात प्रसिद्ध नाव. अ‍ॅपल प्रॉडक्ट यशस्वी करण्यात स्टीव जॉब्स यांचे विचार आणि रचनात्कतेचे मोठे योगदान होते. आज ते नसले तरी त्यांच्या विचारांना जगभरातील लोक आदर्श मानतात. पण आज बातमी स्टीव्ह यांची नसून त्यांची लेक इव जॉब्स हिच्याबद्दल आहे.
2 / 10
स्टीव्ह यांची सर्वात लहान मुलगी इव हिने मॉडेलिंगच्या दुनियेत करिअर सुरु केले आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीत तिचा हा डेब्यू सध्या चांगलाच चर्चेत आहेत.
3 / 10
22 वर्षांच्या इवने Glossier's Holiday कंपनीसाठी एक फोटोशूट केले. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये इवने बाथटममध्ये पोज दिल्या आहेत. हे एक न्यूड फोटोशूट आहे.
4 / 10
इव ही सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे अनेक फोटो ती शेअर करत असते.
5 / 10
स्टीव्ह जॉब्सची मुलगी असूनही इव लाईमलाईटपासून आत्तापर्यंत दूर होती. विशेषत: पिता स्टीव्ह यांच्या निधनानंतर तिने लाईमलाईटपासून जाणीवपूर्वक स्वत:ला दूर ठेवले.2011 साली स्टीव्ह यांचे निधन झाले.
6 / 10
अलीकडे जगातील सर्वोत्तम घोडेस्वारांच्या यादीत इवने पाचवे स्थान पटकावले होते.
7 / 10
25 वर्षांखालील सर्वोत्तम घोडेस्वारी करणारी ती पाचवी बेस्ट राइडर ठरली होती.
8 / 10
इव सध्या स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीत शिकतेय. याच युनिव्हर्सिटीत इवचे आईबाबा म्हणजे, स्टीव्ह आणि लॉरेन भेटले होते.
9 / 10
इव ही स्टीव आणि लॉरेन पॉवेल यांची मुलगी आहे. या दांम्पत्याला तीन मुलं आहेत.
10 / 10
इवचे इन्स्टावर दीड लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहे.
टॅग्स :स्टीव्ह जॉब्स