Join us  

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात RRR ची हवा! रामचरणच्या पत्नीचा दिसला प्रेग्नंसी ग्लो; बघा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 9:21 AM

1 / 7
95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा भारतीय कलाकारांची हवा दिसली. साऊथ सुपरस्टार रामचरण संपूर्ण आरआरआर टीमसह सोहळ्यात दाखल झाला.
2 / 7
यावेळी त्याची पत्नी उपासना कामिनेनीवर सर्वांच्या नजरा खिळल्या. या शानदार जोडीने सर्वांचेच लक्ष वेधले. काळ्या सूटमध्ये रामचरण नेहमीसारखाच हॅंडसम दिसत होता तर पत्नी उपासनाने पारंपारिक वेशभूषा केली होती.
3 / 7
तर पांढऱ्या रंगाच्या साडीत रामचरणची पत्नी उपासना हिचं सौंदर्य खुललं होतं. तिने गळ्यात मोत्यांचा हार घातला होता तर केस बन स्टाईलमध्ये बांधलेले होते.
4 / 7
उपासना गरोदर असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. उपासनाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो दिसत होता. दोघांनी कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या.
5 / 7
तर दुसरीकडे एसएस राजामौली देखील पत्नीसोबत दाखल झाले. त्यांनी सोहळ्यासाठी पारंपारिक लुकचीच निवड केली. जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाच्या धोती असा त्यांचा लुक होता. तर त्यांच्या पत्नी साध्या केशरी आणि गुलाबी रंगाच्या साडीमध्ये सुंदर दिसत होत्या.
6 / 7
अभिनेत्री दीपिका पदुकोणने व्यासपीठावरुन 'नाटू नाटू' गाण्याच्या परफॉर्मन्सची घोषणा केली. गाण्याचा उल्लेख होताच प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला तर गाण्याच्या परफॉर्मन्सला स्टॅंडिंग ओव्हेशनही मिळाले.
7 / 7
यंदाच्या ऑस्कर पुरस्काराकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं होतं. भारतीयांच्या अपेक्षांवर खरं उतरत एसएस राजामौली यांच्या आरआरआर सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याने ऑस्कर पटकावत इतिहास रचला.
टॅग्स :ऑस्करआरआरआर सिनेमाएस.एस. राजमौलीज्युनिअर एनटीआर