Join us  

तरूण दिसण्यासाठी चिंतेत चार मुलांची आई kim kardashian, म्हणाली - यासाठी पॉटीही खाऊ शकते...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 12:53 PM

1 / 6
अमेरिकन टीव्ही स्टार किम कर्दाशिया नेहमीच तिच्या आउटफिटमुळे चर्चेत असते. पण किमने आता असं काही वक्तव्य केलं आहे ज्यामुळे सगळेच हैराण झाले. याला किमचं आयुष्टभर तरूण दिसण्याची पॅशन म्हणा की, ब्युटी ऑब्सेशन पण किमचं हे वक्तव्य तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.
2 / 6
किम कर्दाशिया आपल्या सौंदर्य कायम ठेवण्यासाठी बरंच काही करते. नेहमीच तिची बॉडी शेपमध्ये राहते. किमने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, जर पॉटी खाल्ल्याने म्हणजे विष्ठा खाल्ल्याने ती तरूण दिसणार असेल तर तिला यात काहीच हरकत नाही.
3 / 6
किमने द न्यूयॉर्क टाइम्ससोबत बोलताना सांगितलं की, जर तुम्ही मला म्हणत असाल की, मी तरूण दिसणार आणि यासाठी मला रोज पॉटी खावी लागेल. तर मी खाणार सुद्धा. किमचं हे वक्तव्य ऐकून सगळेच हैराण झाले आहेत.
4 / 6
किम एक सक्सेसफुल बिसनेसवुमन आहे. नुकतीच तिने तिच्या स्कीनकेअर ब्रॅन्ड SKKN ची घोषणा केली आहे. किम नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. लोक तिच्या परफेक्ट फिगरचे दिवाने आहेत.
5 / 6
किम कर्दाशिया काही दिवसांपूर्वी मेट गालामधील आपल्या लूक मुळेही चर्चेत होती. मेट गालामध्ये किमने Marilyn Monroe चा आयकॉनिक ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये फिट येण्यासाठी किमने 3 आठवड्यात 7 किलो वजन कमी केलं होतं.
6 / 6
किम सध्या कॉमेडिअन पीट डेविडसनला डेट करत आहे. पीट 28 वर्षाचा आहे आणि किमचं वय 40 आहे. किम तिचा बॉयफ्रेन्ड कान्ये वेस्टपासून वेगळी झाली आहे. दोघांचं नातं तुटताच त्यांच्यात वाद झाला होता. त्यांना 4 मुलं आहेत.
टॅग्स :किम कार्देशियनहॉलिवूडसेलिब्रिटी