'हे बेबी'ची लिटिल एंजेल आता झाली 'ब्युटीफुल गर्ल'; फोटो पाहून चाहते म्हणाले - 'हा तर सुपरमॉडेलचा लूक!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:11 IST
1 / 10अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान अभिनीत २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हे बेबी' चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. 'हे बेबी'ने जिथे खूप हसवलं, तिथे अनेक ठिकाणी भावुकही केलं. 2 / 10साजिद खानच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट अमेरिकेतील 'थ्री मॅन अँड ए बेबी' या चित्रपटावर आधारित होता आणि तो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.3 / 10चित्रपटातील तिन्ही मुख्य अभिनेत्यांव्यतिरिक्त, एक गोंडस लहान मुलगी होती, जिने सगळी लाइमलाइट लुटली होती. चित्रपटात क्युट एंजेलची भूमिका जुआना सांघवी या गोड मुलीने साकारली होती. 4 / 10चित्रपटाच्या १८ वर्षांनंतर, जुआनाची फोटो सोशल मीडियावर पुन्हा समोर आली आहेत, जी पाहून तिचे चाहते खूश झाले आहेत.5 / 10गोंडस जुआनाने 'हे बेबी' चित्रपटातून केवळ प्रेक्षकांचेच नव्हे, तर चित्रपटातील कलाकारांचेही मन जिंकले होते. जानेवारी २०२२ मध्ये फरदीन खानने 'हे बेबी'मधील पडद्यामागचा फोटो शेअर केला होता. 6 / 10त्याने ट्वीटमध्ये लिहिले होते की, लहानग्या जुआनासोबत सीन करण्यासाठी त्याने सिगारेट ओढणे सोडले होते. चित्रपटाच्या रिलीज झाल्यानंतर जुआनाच्या क्यूटनेसवर प्रेक्षकांसोबतच समीक्षकही फिदा झाले होते. 7 / 10अनेक लोकांचे असे मत आहे की, चित्रपटातील एंजेलने तिन्ही स्टार्सची लाइमलाइट लुटली होती.8 / 10नुकतेच जुआनाच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो व्हायरल झाले. आता २१ वर्षांची झालेल्या जुआनाला या फोटोंमध्ये ओळखणेही कठीण होत आहे. 9 / 10जुआनाचे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी तिला पुन्हा चित्रपटांमध्ये परत आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच ती सुपरमॉडेल दिसत असल्याचंही काहींनी म्हटलंय.10 / 10आता मोठी झाल्यावर जुआना बॉलिवूडमध्ये कमबॅक करेल का, हे पाहणे कमालीचे ठरेल.