Join us  

PHOTOS: स्पृहा जोशीच्या 'अहो'ना पाहिलंत का?, तो आहे 'या' क्षेत्रात कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 12:45 PM

1 / 10
मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे. (Photo Instagram)
2 / 10
आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. 'मोरया', 'पैसा पैसा' यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली.(Photo Instagram)
3 / 10
अग्निहोत्र, आभाळमाया, उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, एक हा असा धागा सुखाचा, दे धमाल, बॉम्बे लायर्स, सत्यमेव जयते, सुपस्टार, सुर नवा ध्यास नवा यासारख्या मालिका व शोमध्ये देखील ती झळकली आहे.(Photo Instagram)
4 / 10
आज कलाविश्वात स्पृहाचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे तिच्याविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.(Photo Instagram)
5 / 10
स्पृहा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती अनेकदा फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना तिच्याविषयीची माहिती देत असते.(Photo Instagram)
6 / 10
स्पृहाने अलीकडेच पती वरद लघाटेसोबतचा फोटो सोशल मीडियावर केला आहे. अनुरुप असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. (Photo Instagram)
7 / 10
अभिनेत्री स्पृहा जोशी आणि वरद लघाटे यांनी सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.(Photo Instagram)
8 / 10
२००८ पासून हे दोघे नात्यात होते आणि अखेर २८ नोव्हेंबर, २०१४ रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले. (Photo Instagram)
9 / 10
वरदचा मराठी चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाही. वरदने त्याची कारकीर्द एक पत्रकार म्हणून सुरू केली. (Photo Instagram)
10 / 10
पण आता पत्रकारितेचे क्षेत्र सोडून वरद मार्केटिंग प्रोफेशनकडे वळला आहे.(Photo Instagram)
टॅग्स :स्पृहा जोशीटिव्ही कलाकार