Good News! लॉकडाउनमुळे पुन्हा एकदा 'रामायण' प्रेक्षकांच्या भेटीला, पहा त्यातील काही फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 18:26 IST
1 / 14रामायण आणि महाभारत या मालिकांना नव्वदीच्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या मालिका सुरू असताना लोक आपापल्या घरातच थांबत असत. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट असायचा. 2 / 14सध्या देशात लॉकडाऊन असल्याने आपल्याला सगळीकडेच अतिशय शांत वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमुळे लोकांना रामायण आणि महाभारत या कार्यक्रमांची आठवण आली आहे. 3 / 14रामायण आणि महाभारत या दोन्ही मालिकांचे या काळात पुन्हा प्रक्षेपण केले जावे अशी मागणी सोशल मीडियावर होत होती आणि आता तर उद्यापासून प्रेक्षकांना रामायण ही त्यांची आवडती मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 4 / 14या मालिकेचा पहिला भाग नॅशनल दूरदर्शनवर उद्या सकाळी नऊ वाजता आणि दुसरा भाग रात्री नऊ वाजता प्रक्षेपित केला जाणार आहे.5 / 14रामायण या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. 6 / 14या मालिकेत रामाची भूमिका अरुण गोविल यांनी तर सीतेची भूमिका दीपिका चिखलियाने साकारली होती. 7 / 14त्या दोघांनीही आपल्या भूमिका इतक्या चांगल्या प्रकारे साकारल्या होत्या की, प्रेक्षक त्यांनाच राम आणि सीता समजून त्यांच्या पाया पडण्यासाठी जात असत.8 / 14या मालिकेने या दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तुम्हाला विश्वास बसणार नाही.9 / 14पण अरुण आणि दीपिका यांच्या दर्शनासाठी लोक रांगा लावत असत.10 / 14तसेच त्यांच्या दर्शनासाठी येताना देवळात ज्याप्रकारे आपण हार, अगरबत्ती, नारळ घेऊन जातो, त्याप्रमाणे लोक घेऊन येत असत.11 / 14नव्वदीच्या दशकातील ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा भेटीला येत आहे.12 / 14त्यामुळे प्रेक्षक खूप खूश आहेत13 / 14पुन्हा एकदा रामायण पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत14 / 14नक्की लुटा रामायणाचा आनंद