Join us  

'या' बॉलिवूड कलाकारांनी केलंय पाकिस्तानी सिनेमात काम, एकीचं तर आलं आयटम साँग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 4:14 PM

1 / 9
सलमान खानचा भाऊ अरबाज खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो. अरबाजने पाकिस्तानच्या 'गॉडफादर' सिनेमात काम केलं आहे. त्यामध्ये त्याने शाकीर खान ही भूमिका निभावली होती.
2 / 9
खासदार आणि अभिनेत्री किरण खेर अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. सध्या त्या रिएलिटी शोच्या जज म्हणूनही काम पाहतात. किरण खेर यांनी 2003 साली आलेल्या 'खामोश पानी' या पाकिस्तानी सिनेमात भूमिका साकारली होती.
3 / 9
आपल्या बेधडक वक्तव्यांनी चर्चेत असलेले ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह पाकिस्तानातही लोकप्रिय आहेत. त्यांनी एक नाही तर दोन पाकिस्तानी सिनेमांमध्ये काम केले आहे. 'खुदा' आणि 'जिंदा भाग' या दोन सिनेमात भूमिका साकारली.
4 / 9
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया नेहमी चर्चेत असते. तिचे चॅट शो सध्या गाजत आहेत. नेहा सुद्धा पाकिस्तानी सिनेमात झळकली आहे. 'प्यार ना करना' या सिनेमात तिने आयटम नंबर केले होते.
5 / 9
कॉमेडीचे बादशाह जॉनी लिव्हर यांनीही पाकिस्तानी सिनेमात काम केलं आहे. २०११ साली आलेल्या लव्ह मे घुम सिनेमात ते दिसले होते.
6 / 9
दिवंगत अभिनेते ओम पुरी यांनी 'अॅक्टर इन लॉ' या सिनेमातून पाकिस्तानी सिनेमात डेब्यू केले. यामध्ये त्यांनी सुखिया ही भूमिका साकारली होती.
7 / 9
अरबाज खानने काम केलेल्या 'गॉडफादर' सिनेमात विनोद खन्ना यांचीही भूमिका होती. 2007 साली सिनेमा रिलीज झाला होता.
8 / 9
२०१४ साली आलेल्या 'सल्तनत' या पाकिस्तानी सिनेमात श्वेता तिवारीने भूमिका साकारली होती. 'परी' असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव होतं.
9 / 9
बॉलिवूडचे खलनायक गुलशन ग्रोवर यांनी 2010 साली आलेल्या 'विरसा' या सिनेमात काम केलं होतं. यामध्ये राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बरही होता.
टॅग्स :अरबाज खानकिरण खेरविनोद खन्नाश्वेता तिवारीसिनेमापाकिस्तान