Join us  

RRR फेम रामचरणची पत्नी उपासना आहे प्रसिद्ध बिझनेसवूमन; जाणून घ्या, कोणकोणते व्यवसाय एकटी सांभाळते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 2:05 PM

1 / 12
दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण याच्या अभिनयाविषयी आणि लोकप्रियतेविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. आज रामचरण दाक्षिणात्य कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. नुकताच तो आरआरच्या रिलीज साठी जपानमध्ये गेला आहे. तिकडे त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 12
रामचरण सोशल मीडियावर कायम चर्चिला जातो. त्यामुळे यात त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफचीही चर्चा होत असते. म्हणूनच, आज आपण त्याच्या पत्नीविषयी जाणून घेणार आहोत. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 12
रामचरणप्रमाणेच त्याची पत्नीदेखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. त्याच्या पत्नीचं नाव उपासना कामिनेनी असं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 12
उपासना, रामचरणप्रमाणेच स्वतंत्र व्यवसाय करत असून ती प्रसिद्ध बिझनेस वूमन असल्याचं सांगण्यात येतं. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 12
रामचरण आणि उपासना यांचं लव्हमॅरेज आहे. त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात कॉलेज जीवनापासून झाली.(फोटो इन्स्टाग्राम)
6 / 12
उपासना आणि रामचरण यांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ते एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर त्यांच्या या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 12
रमचरणचा 'मगधीरा' प्रदर्शित झाल्यानंतर हे दोघं एकमेकांना डेट करु लागले. ११ डिसेंबर २०११ मध्ये कुटुंबाच्या संमतीने या जोडीने साखरपुडा केला. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 12
उपासना एक यशस्वी इंटरप्रन्योर आहे. तसंच ती अपोलो लाइफची व्हॉइस प्रेसिडेंट आणि बी पॉझिटिव्ह मॅगझीनची एडिटर इन चीफदेखील आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 12
उपासनाने लंडनमधील regent युनिव्हर्सिटीतून इंटरनॅशनल बिझनेस मार्केटिंग अँण्ड मॅनेजमेंटची डिग्री घेतली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
10 / 12
उपासनाचे सोशल मीडियावर ५.९ मिलिअन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्रानम)
11 / 12
१२ जून २०१२ मध्ये रामचरण आणि उपासना या दोघांचं थाटात लग्न झालं. त्यांच्या लग्नाला जवळपास १० वर्ष झाली आहेत. मात्र, त्यांच्यातील प्रेम यत्किंचितही कमी न झाल्याचं पाहायला मिळतं.
12 / 12
उपासना एका बिझनेसमॅनची मुलगी असून तिचे आजोबा डॉक्टर प्रताप सी रेड्डी हे ओपोलो हॉस्पिटलचे चेअरमॅन आहेत. तर, तिचे वडील अनिल कामिनेनी KEI ग्रुपचे फाऊंडर आहेत. त्याचप्रमाणे तिची आई शोभना या देखील अपोलो हॉस्पिटलमध्ये एक्झिकेटिव्ह व्हॉइस चेअरपर्सन आहेत. (फोटो इन्स्टाग्रानम)
टॅग्स :राम चरण तेजाTollywoodसेलिब्रिटी