Join us  

धर्मेंद्र यांची सून आहे एकेकाळची मिस इंडिया, आता लाइमलाइटपासून राहते दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 8:22 AM

1 / 8
दीप्ति भटनागर (Deepti Bhatnagar) ९० च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट राहिलेली आहे. पॉप्युलर गाणं ‘मेरा लॉन्ग गवाचा’ मधून चाहत्यांना घायाळ करणाऱ्या दीप्तिचं वय वाढलं आहे. दीप्ति भटनागर (Deepti Bhatnagar) ने टीव्ही शो 'यात्रा' होस्ट केला होता. त्या शोच्या माध्यमातून ती घराघरात जाऊन पोहोचली होती. देशभरातील मंदिरं आणि धार्मिक स्थळांची तिने माहिती दिली होती. त्यावेळी दीप्तिची साडी आणि तिच्या दागिन्यांची खूप चर्चा व्हायची.पण 2004 नंतर ती बॉलिवूडमधून गायब झाली. दीप्ती भटनागर देओल कुटुंबाचा भाग असल्याचं खूप कमी जणांना माहिती आहे.
2 / 8
काही महिन्यांपूर्वी झालेल्या सनी देओलचा मुलगा आणि धर्मेंद्र यांचा नातू करण देओलच्या लग्नात दिप्ती दिसली होती. तिच्या फोटोंनी सगळयांचं लक्ष वेधून घेतेलं होते. आज दिप्तीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिचं देओल कुटुंबाशी असलेले नातं.
3 / 8
दीप्ती भटनागरचे धर्मेंद्र यांच्या कुटुंबाशी खास नाते आहे. खरं तर ती धर्मेंद्र यांची सून आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसे? दीप्ती भटनागरचा लग्न धर्मेंद्र यांचा चुलत भाऊ वीरेंद्र यांचा मुलगा रणदीप आर्यशी झालं आहे. त्यामुळे ती वीरेंद्र तसेच धर्मेंद्र यांची सून आहे.
4 / 8
दीप्ती भटनागरने 1990 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकली होती. यानंतर तिने अभिनेत्री म्हणून करिअरला सुरुवात केली.
5 / 8
दीप्तीचा पहिला चित्रपट 'रामशास्त्र' होता. यानंतर ती तेलगू चित्रपट 'पेल्ली संदाडी', अमेरिकन चित्रपट 'इन्फर्नो' आणि हिंदी चित्रपट 'मन' यासह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसली.
6 / 8
अभिनेत्री असण्यासोबतच दीप्ती ही खेळाडूही राहिली आहे. ती राज्यस्तरावर हॉकी आणि बॅडमिंटन खेळायची.
7 / 8
आता दीप्ती भटनागर प्रॉडक्शन कंपनी चालवते. या माध्यमातून ती डबिंग, एडिटिंग आणि पोस्ट-प्रॉडक्शनची कामं करते. ती या कंपनीत बिझी आहे. आत्तापर्यंत दीप्तीने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोजची निर्मिती केली आहे.
8 / 8
लाईमलाईटपासून दूर असलेली दिप्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. दिप्तीचे लेटेस्ट फोटो बघून नेटकरी तिच्या सौंदर्याचे कौतुक करत असतात.
टॅग्स :धमेंद्रसनी देओल