Join us  

आमचं ठरलं म्हणत दिली प्रेमाची कबुली, स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीच्या साखरपुड्याचा अल्बम पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 4:14 PM

1 / 9
छोट्या पडद्यावरील 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar). काही दिवसांपूर्वीच स्वानंदीने आमचं ठरलं असं म्हणत प्रेमाची कबुली दिली.
2 / 9
त्यानंतर स्वानंदीचा नुकताच प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णी (ashish kulkarni) याच्यासोबत साखरपुडा पार पडला. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये तिची चर्चा रंगली आहे.
3 / 9
स्वानंदी आणि आशिषने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
4 / 9
स्वानंदी आणि आशिषच्या साखरपुड्याच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्स होताना दिसत आहे.
5 / 9
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत स्वानंदीने मिनल ही भूमिका साकारली होती. याशिवाय ती अस्सं माहेर नको गं बाई या मालिकेत दिसली होती.
6 / 9
तसेच तिने ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई’ या मालिकांमध्येही काम केलं आहे.
7 / 9
तर आशिष कुलकर्णी गायक आहे आणि त्याने इंडियन आयडॉलच्या बाराव्या सीझनमध्ये सहभाग दर्शवला होता.
8 / 9
याशिवाय मराठी चित्रपटातील गाणीही त्याने गायली आहेत. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत आशिषने स्वतःची ओळख बनवली आहे.
9 / 9
स्वानंदी आणि आशिष लग्न कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
टॅग्स :स्वानंदी टिकेकर