Join us  

OMG!! सलमानची हिरोईन जरीन खान ‘या’ बिग बॉस स्पर्धकाला करतेय डेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 3:59 PM

1 / 8
सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री जरीन खान बॉलिवूडमध्ये फार कमाल दाखवू शकली नाही. पण सध्या चर्चा आहे ती तिच्या रिलेशनशिपची.
2 / 8
होय, जरीन सध्या ‘बिग बॉस 12’च्या एका माजी स्पर्धकाला डेट करत असल्याची चर्चा आहे. त्याचं नाव शिवाशीष मिश्रा. गेल्या ऑगस्ट महिन्यात जरीन शिवाशीषसोबत गोव्यात व्हॅकेशनवर गेली होती.
3 / 8
गेल्या अनेक दिवसांपासून दोघं एकत्र फिरताना दिसतात, एकमेकांसोबत बॉलिवूडच्या इव्हेंटला, पार्ट्यांना सोबत जातात. आता यावर जरीनने पहिल्यांदा चुप्पी तोडत खुलासा केला आहे.
4 / 8
ती म्हणाली, मी आणि शिवाशीष एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, आम्हाला एकमेकांची कंपनी आवडते. आता हे कुठे पर्यंत जातं ते पाहूया. आम्ही एकमेकांना अगदी अलीकडेच ओळखायला लागलो आहोत. या वर्षाच्या सुरुवातीला मी त्याला भेटले. त्यामुळे लगेच यावर काहीही बोलणं घाईचं ठरेल.
5 / 8
शिवाशीष मिश्राला डेट करत आहेस का? असं विचारलं असता, ‘आम्ही डेट करत आहोत किंवा नाही, आम्ही चांगले मित्र आहोत. मी याबाबतीत खूप जुन्या विचारांची आहे. आम्ही एका सुंदर वळणावर आहोत आणि मी आनंदात आहे, असं ती म्हणाली.
6 / 8
दोघं प्रेमात आहात का? असं विचारल्यावर जरीन काहीशी लाजली. ‘मी आत्ता यावर काहीच बोलणार नाही. तुम्ही हे समजून घेण्याइतके हुशार आहात. खासगी आयुष्याबद्दल बोलणं मला जरा विचित्र वाटतं,’असं ती म्हणाली.
7 / 8
शिवाशीषबद्दल ती म्हणाली, तो खरोखर एक चांगला माणूस आहे. लहान मुलासारखा निरागस आहे. मी सुद्धा तशीच आहे. आमच्यात कोणताही दिखावा नाही आणि फक्त प्रामाणिकपणा आहे.
8 / 8
शिवाशीषने ‘बिग बॉस 12’मध्ये कॉमन मॅन म्हणून एन्ट्री घेतली होती. अर्थात तो लवकरच घराबाहेर पडला होता.
टॅग्स :जरीन खानबॉलिवूड