Join us  

कतरिना कैफमुळे माझे करिअर बर्बाद झाले! जरीन खानने काढली भडास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 2:21 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानने सलमान खानसोबत ‘वीर’ चित्रपटातून डेब्यू केला होता. हुबेहुब कतरीना कैफ सारखी दिसते म्हणून तिची बरीच चर्चा झाली होती.
2 / 10
पण आता हेच कतरीनासारखे रूप जरीनच्या मार्गातील अडथळा ठरला आहे. सतत कतरिनासोबत होत असलेली तुलना जरीनला नकोशी झाली आहे.
3 / 10
नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत जरीन यावर बोलली. कतरिनामुळे माझे करिअर बरबाद झाले, असे जरीन म्हणाली.
4 / 10
आधी मी आईसारखी दिसते, असे लोक म्हणायचे. पण चित्रपटसृष्टीत आले आणि मी कतरिना कैफसारखी दिसते, असे लोक म्हणू लागले, असे ती म्हणाली.
5 / 10
आज कोणताही निर्माता-दिग्दर्शक माझ्यासोबत काम करू इच्छित नाही. मी कतरिनासारखी दिसते असे त्यांना वाटते. अशात एका डुप्लिकेटना कोणता निर्माता काम देईन? असा सवाल करत तिने मनातील भडास काढली.
6 / 10
मी कतरिना सारखी दिसते, हे गेल्या 11 वर्षांपासून मी ऐकते आहे. याचा माझ्या करिअरवर परिणाम झाला, असेही ती म्हणाली.
7 / 10
काही लोकांनी तर मी प्रिती झिंटासारखी दिसते म्हटले. काहींनी मी पूजा भट सारखी दिसते म्हटले. मी जरीन खान आहे, असे लोक कधीच म्हणत नाहीत, असेही ती म्हणाली.
8 / 10
प्रत्येकजण बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपड असतो. मी सुद्धा त्यापैकीच एक़ पण एका अभिनेत्रीची डुप्लिकेट म्हणून माझ्या माथी शिक्का मारला गेला आणि माझे करिअर बरबाद झाले, असे ती म्हणाली.
9 / 10
‘वीर’नंतर हाऊसफूल २, हेट स्टोरी ३ या सिनेमातही ती दिसली होती. यानंतर मात्र तिचा ‘1921’ हा सिनेमा आपटला.
10 / 10
2017 मध्ये रिलीज झालेला ‘अक्सर 2’ हा सिनेमाही फ्लॉप ठरला. यामुळे तिने पंजाबी व तेलगू सिनेमांकडे मोर्चा वळवला.
टॅग्स :जरीन खानकतरिना कैफ