Join us  

Year Ender 2021: सिद्धार्थ ते दिलीप कुमार...; 2021 मध्ये ‘या’ कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 8:00 AM

1 / 13
बॉलिवूड इंडस्ट्रीनं 2021 या मावळत्या वर्षांत अनेक धक्के पचवले. या वर्षात अनेक प्रसिद्ध कलाकारांनी जगाचा निरोप घेतला.
2 / 13
रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे धाकटे भाऊ राजीव कपूर यांचं 9 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून अपार लोकप्रियता मिळवलेले राजीव कपूर यांच्या निधनाच्या धक्क्यातून कपूर कुटुंब अजूनही सावरलेलं नाहीये.
3 / 13
गतकाळातील अभिनेत्री शशिकला सहगल यांनी 4 एप्रिलला अखेरचा श्वास घेतला. त्या 88 वर्षांच्या होत्या. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या.
4 / 13
मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते किशोर नांदलस्कर यांनी 20 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. कोरोनावरील उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
5 / 13
नदीम-श्रवण या गोडजोडीतील एक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक श्रवण राठोड यांचं 23 एप्रिल रोजी निधन झालं होतं. त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
6 / 13
लोकप्रिय टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांनीही कोरोनामुळे प्राण गमावला. 1 मे रोजी वयाच्या 52 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
7 / 13
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची 7 जुलैला प्राणज्योत मालवली. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
8 / 13
टेलिव्हिजनसह मोठा पडदा गाजवणा-या अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचे 16 जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या 75 वर्षांच्या होत्या.
9 / 13
प्रतिज्ञा या मालिकेत सज्जन सिंहच्या भुमिकेमुळे नावारूपास आलेले अनुपम श्याम यांनी 8 ऑगस्टला जगाचा निरोप घेतला.
10 / 13
2 सप्टेंबरला ‘बिग बॉस 13’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं अकाली निधन झालं. हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तोच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.
11 / 13
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नट्टू काकाची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांनी 3 ऑक्टोबरला अखेरचा श्वास घेतला. कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं.
12 / 13
रामायण या पौराणिक मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांनी 6 ऑक्टोबरला जगाचा निरोप घेतला.
13 / 13
अनुपमा या मालिकेमुळे नव्यानं चर्चेत आलेल्या अभिनेत्री माधवी गोगटे यांचा 21 नोव्हेंबरला कोरोनामुळे मृत्यू झाला.
टॅग्स :बाय-बाय २०२१बॉलिवूडसिद्धार्थ शुक्लादिलीप कुमारराजीव कपूर