एकेकाळी व्हायचं होतं IAS, आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री; ओळखा कोण आहे 'ही' सुंदरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:55 IST
1 / 11या अभिनेत्रीला एकेकाळी IAS अधिकारी व्हायचं होतं पण पुढे काहीतरी वेगळच लिहिलं होतं. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली आणि अनेक सुपर-डुपर हिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2 / 11आज ही अभिनेत्री इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. यामी गौतम ही पंजाबी चित्रपट दिग्दर्शक मुकेश गौतम यांची मुलगी आहे.3 / 11हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत यामीने खुलासा केला होता की, तिने कधीही अभिनेत्री होण्याचा विचार केला नव्हता.4 / 11'मला आयएएस अधिकारी व्हायचं होतं तेव्हा कुटुंबातील काही मित्र चंदीगडला आम्हाला भेटायला आले आणि त्यांनी माझ्या पालकांना सांगितलं की मी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचा प्रयत्न करावा' असं यामीने सांगितलं.5 / 11यामीने यानंतर अभिनय करण्याचा विचार केला. अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. चांद के पार चलो, ये प्यार ना होगा कम यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं.6 / 11२०१२ मध्ये तिने आयुष्मान खुरानासोबत 'विकी डोनर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट यामीच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला.7 / 11खरंतर हा चित्रपट सुपरहिट झाला आणि यामीलाही रातोरात इंडस्ट्रीत ओळख मिळाली. या चित्रपटानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही.8 / 11यामी गौतमने आतापर्यंत अॅक्शन जॅक्सन, बदलापूर, सनम रे, हृतिक रोशनसोबत काबिल, उरी: द सर्जिकल स्ट्राइक, बाला, अ थर्सडे, दसवी, ओएमजी २ असे अनेक उत्तम चित्रपट केले आहेत.9 / 11यामी गौतमचं लग्न उरीचे दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी झालं आहे. त्यांना एक गोड मुलगा देखील आहे, ज्याचं नाव वेदाविद असं आहे. 10 / 11यामी गौतम सोशल मीडियावरही खूप एक्टिव्ह असते. ती तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स सतत शेअर करत असते. 11 / 11