Join us

सामान्य शिक्षिका ते मिसेस वर्ल्ड, अशी झाली सरगम कौशलची ग्लॅमर जगाकडे वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 15:23 IST

1 / 8
Who Is Mrs World 2022 Sargam Koushal: तब्बल २१ वर्षांच्या प्रतिक्षेनतंर भारतानं मिसेज वर्ल्डचा किताब जिंकला आहे. सरगम कौशल मिसेस वर्ल्ड २०२२ची विजेती ठरली आहे. जाणून तिच्याबद्दलच्या इंटरेस्टिंग गोष्टी..(फोटो इन्स्टाग्राम)
2 / 8
लास वेगासमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'मिसेस वर्ल्ड २०२२' स्पर्धेत ६३ देशांतील स्पर्धकांना मात देत सरगमनं विजेतेपद पटकावलं आहे. भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
3 / 8
सरगमच्या आधी २१ वर्षांपूर्वी २००१मध्ये डॉ.अदिती गोवित्रीकर मिसेस वर्ल्ड झाली होती. यावर्षी ती 'मिसेस वर्ल्ड 2022'ची जज म्हणून दिसली. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 8
सरगम कौशल ही जम्मू-काश्मीरची आहे. सध्या ती मुंबईत राहते. याच वर्षी तिनं 'मिसेस इंडिया वर्ल्ड 2022'चा खिताब सुद्धा जिंकला होता. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 8
सरगम कौशलच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर ती खूप शिकलेली आहे. तिनं इंग्रजी लिटरेचरमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 8
मॉडलिंगच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी ती विशाखापट्टणमच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 8
सरगम कौशलनं ३ डिसेंबर २०१७मध्ये आदित्य मनोहर शर्मा यांच्याशी विवाह केला. आदित्य भारतीय नौदलातील लेफ्टनंट कमांडर आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 8
सरगम कौशल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचं ३० हजारापेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)