Join us

​डेब्यू चित्रपटानंतर तीन वर्षे काय करीत होता अर्शद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 20:27 IST

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. मुन्नाभाई एमबीबीएस, सहेर, इश्किया व जॉली एलएलबी ...

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. मुन्नाभाई एमबीबीएस, सहेर, इश्किया व जॉली एलएलबी या चित्रपटातून केवळ आपल्या टॅलेंच्या भरवश्यावर ओळख मिळविणाºया अर्शदने बॉलिवूडममध्ये मोठा संघर्ष केला आहे. पहिल्या चित्रपटानंतर तीन वर्षापर्यंत त्याच्याकडे एकही चित्रपट नव्हता. ‘तेरे मेरे सपने’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. यामुळे त्याला अनेक चित्रपट निर्माते काम देण्यासाठी नकार देत होते. यामुळे तो बेरोजगार होता. या काळात त्याची पत्नी मारिया गोरेटीने त्याला मोठा आधार दिला. आपल्या संघर्षाच्या काळाबद्दलची माहिती देताना अर्शद म्हणाला, मी या संघर्षाच्या काळातून निघू शकलो कारण माझी पत्नी मारिया माझ्यासोबत होती. माझ्याजवळ नोकरी नव्हती. नशीबाने मारिया तेव्हा नोकरी करीत होती. यामुळे अनेक गोष्टी शक्य झाल्या. आमचे अनेक बिल पेड होत होते. तीन वर्षांपर्यंत माझ्याजवळ एकही चित्रपट नव्हता. अर्शद म्हणाला, जेव्हा लोक तुमच्या कामाला ओळखत नाही तेव्हा आपण असुरक्षित आहोत असे वाटायला लागते. जर त्या व्यक्तीला त्याची जाणीव असेल तर तो ओळखेल. काही काळासाठी तुम्हाला अ‍ॅक्टिंग सोडावी लागते, मात्र काही दिवसांनंतर लोक तुम्हाला ओळखू लागतात. माझ्या जवळ काम नव्हते पण मी माझ्या क्षमतेवरील विश्वास कमी होऊ दिला नाही. राजकुमार हिरानी यांच्या मुन्नाभाई एमबीबीएसने अर्शदच्या करिअरला नवा स्टार्ट दिला. या चित्रपटातील भूमिकेबद्दल अर्शद म्हणाला, जर तुम्ही हा चित्रपट पहीला तर असे लक्षात येईल की माझ्या भूमिकेची यात गरजच नाही. मात्र जर तुम्हाला काम येत असेल तर तुम्ही स्वत:ला कसे दाखविणार आहात हे समजले तर लोक तुम्हाला ओळखायला लागतील. अभिनेता अर्शद वारसीचा चित्रपट येऊन बरेच दिवस झाले आहेत. त्याची प्रमुख भूमिका असलेला जॉली एलएलबीच्या सिक्वलमध्ये अक्षय कुमारला संधी मिळाली. मात्र लोकांच्या लक्षात राहिला तो केवळ अर्शदच. अर्शदच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी म्हणावी लागले. त्याचा इरादा हा चित्रपट लवकर रिलीज होणार आहे.  या चित्रपटात तो पोलीस अधिकाºयाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘इरादा’ या वर्षीचा सर्वोत्कृष्ठ चित्रपट ठरू शकतो असा अंदाज चित्रपट समीक्षक लावत आहेत.