Join us  

'असुर' मधून १८ वर्षांच्या मुलाने जिंकलंय मन, याच्या हिंदीसमोर भलेभले फेल; कोण आहे हा कलाकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 3:04 PM

1 / 8
वेबसिरीज म्हणजे सध्याचा सर्वात आवडता कंटेट झालाय. अनेक विषयांवर जबरदस्त वेबसिरीज रिलीज होत आहेत ज्यामुळे प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन होतंय. त्यातलीच एक सध्याची गाजत असलेली वेबसिरीज 'असूर' (Asur).
2 / 8
'असुर'चा दुसरा पार्ट सध्या रिलीज झाला आहे. पहिल्या भागाच्या तुफान यशानंतर दुसरा भागही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. पौराणिक कथेवर आधारित या वेबसिरीजमध्ये असूर करत असलेली मर्डर मिस्ट्री सोडवण्यासाठी सीबीआय टीमची होत असलेली धडपड अप्रतिमरित्या मांडण्यात आली आहे.
3 / 8
वेबसिरीजमधील सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केलाय. अर्शद वारसी, वरुण सोबती या लीड अॅक्टर्सला एक १८ वर्षांचा मुलगा जबरदस्त टक्कर देताना दिसतोय. तो म्हणजे शुभ जोशीची भूमिका साकारणारा अभिनेता विशेष बन्सल (Vishesh Bansal). विशेष बन्सल नक्की आहे तरी कोण जाऊन घेऊया.
4 / 8
सध्या विशेष असुरमध्ये साकारत असलेल्या शुभ जोशी या भूमिकेमुळे खूपच चर्चेत आला आहे. त्याने असुर १ मध्येही काम केलं आहे. तर 'असुर २' मध्ये आता शुभ जोशी जगात कलियुग प्रस्थापित करण्याच्या तयारित आहे. सिरीजमध्ये त्याची हिंदी भाषेवर असलेली पकड वाखणण्याजोगी आहे.
5 / 8
शुभ जोशी स्क्रीनवर आला की नजरच हटत नाही. पौराणिक कथांवर त्याचा विश्वास असतो. धर्म आणि कर्मा नुसार तो लोकांची हत्या करत असतो. प्रत्येक एपिसोडच्या सुरुवातीला शुभ जोशीपासूनच कथेला सुरुवात होताना दाखवण्यात आलंय. त्याने या सिरीजमध्ये केलेले काम पाहून एक क्षण हादरायला होतं.
6 / 8
7 / 8
'बुद्धा' मालिकेत त्याने गौतम बुद्धांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. तर 'सूर्यपुत्र कर्ण' मालिकेतही तो कर्णाच्या भूमिकेत दिसला. यासाठी त्याने वयाच्या १० व्या वर्षीच घोडेस्वारी, तिरंदाजीचं प्रशिक्षण घेतलं.
8 / 8
विशेषने वेबसिरीजमध्येही नाव कमावत आहे. 'ये मेरी फॅमिली','गुटर गू' या चर्चेतल्या वेबसिरीजमध्ये त्याची महत्वाची भूमिका होती. तर स्कॅम 1992 मध्येही तो दिसला. आता असुर मधून त्याने प्रेक्षकांना प्रेमातच पाडलं आहे.
टॅग्स :वेबसीरिजअर्शद वारसीरिद्धी डोगराटिव्ही कलाकार