Join us

​विद्या बालनची बहीण प्रियामणि आहे तिच्याइतकीच हॉट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 12:09 IST

विद्या बालन ही बॉलिवूडची गुणी अभिनेत्री. विद्या बालनला आपण सगळेच ओळखतो. बॉलिवूडच्या सर्वाधिक बोल्ड आणि सुंदर अभिनेत्रींत तिची गणना ...

विद्या बालन ही बॉलिवूडची गुणी अभिनेत्री. विद्या बालनला आपण सगळेच ओळखतो. बॉलिवूडच्या सर्वाधिक बोल्ड आणि सुंदर अभिनेत्रींत तिची गणना होते. पण केवळ विद्याच नाही तर तिची बहीणही तिच्याइतकीच हॉट आणि सुंदर अभिनेत्री आहे. विद्याच्या या बहिणीला फार कमी लोक जाणतात. पण ती साऊथची सुपरस्टार आहे. आम्ही बोलतोय, ते विद्या बालनची चुलत बहीण प्रियामणि हिच्याबद्दल.प्रियामणी साऊथच्या बड्या स्टार्सपैकी एक आहे. तिच्या बोल्डनेससाठी ती ओळखली जाते. बॉलिवूडच्या एक-दोन चित्रपटांत प्रियामणि दिसली खरी. बॉलिवूडच्या काही आयटम साँगमध्येही ती दिसली. पण बॉलिवूडमध्ये ती फार काही खास करू शकली नाही.ALSO READ : ‘तुम्हारी सुलू’मध्ये विद्या बालनबरोबर झळकणार रणबीर कपूर!!प्रियामणिचे पूर्ण नाव प्रिया वासुदेव अय्यर आहे. शाळेच्या दिवसांतच तिने कांचीवरम सिल्क आणि इरोड सिल्कसाठी मॉडेलिंग केली होती. १२ वीत असतानाच तामिळ दिग्दर्शक भारतीराजा यांनी तिला चित्रपटसृष्टीत लॉन्च केले होते. यानंतर प्रियामणिने कधीच मागे वळून बघितले नाही.साऊथच्या सर्वाधिक चर्चित दलित विद्यार्थीनीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी प्रियामणिने काहीसे वादग्रस्त टिष्ट्वट केले होते. भारत मुलींसाठी सुरक्षित नाही. मुलींनी देश सोडायला हवा, असे तिने लिहिले होते. प्रियामणिच्या या टिष्ट्वटनंतर युजर्सनी तिला चांगलेच सुनावले होते. अनेकांनी तिला देशद्रोही ठरवत आमिर खानची बहीण संबोधले होते.शाहरूख खानचा चित्रपट ‘चेन्नई एक्सप्रेस’ यातील ‘वन टू थ्री फोर’ या गाण्यात प्रियामणिने कॅमिओ केला होता. मणिरत्नम यांच्या ‘रावण’ या सिनेमात ती अभिषेक बच्चनसोबत दिसली होती. अलीकडे प्रियामणिने ‘बॉम्बे’सारख्या सिनेमात काम करून चुकलेला अभिनेता अरविंद स्वामी याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. माझी भूमिका महत्त्वाची नाही, असे सांगून तिने या चित्रपटात काम करण्याचे नाकारले होते.