Join us  

PICS : उर्वशीची उंची ठरली अडसर, ‘लॅम्बॉर्गिनी’मधून बाहेर पडताना अशी झाली दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 1:36 PM

1 / 9
‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते.
2 / 9
सोशल मीडियावर ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या वेगळाच कारणाने चर्चेत आहे.
3 / 9
होय, अलीकडे उर्वशी अलिशान लॅम्बॉर्गिनी कारमधून शूटींगस्थळी पोहोचली. पण तिच्या उंचीमुळे या कारमधून तिला बाहेर पडतांना तिची चांगलीच दमछाक झाली.
4 / 9
उर्वशीने स्वत: या कारमधून बाहेर पडतानाचे फोटो शेअर केले आहे. इन्स्टाग्राम विरूद्ध वास्तव. उंच पोरींची समय्या, असे कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले.
5 / 9
उर्वशीच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स दिल्या आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6 / 9
उर्वशी अलीकडे ‘वर्साचे बेबी’ या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती. लवकरच ती ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.
7 / 9
बॉलिवूडमध्ये नशीब अजमवल्यानंतर उर्वशी रौतेला आता तामीळ सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
8 / 9
उर्वशीने चित्रपटासाठी तब्बल 10 कोटी रुपये घेतले आहेत आणि त्यामुळेच उर्वशी तमिळ फिल्म इंडस्ट्रीची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
9 / 9
2011 मध्ये उर्वशीने मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला
टॅग्स :उर्वशी रौतेला