गोव्यात पार पडले युवी-हेजलच्या लग्नाचे पारंपारिक विधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 14:14 IST
गोवा म्हटलं की, डोळ्यासमोर येतं निसर्गसंपन्न वातावरण, नयनरम्य बीचेस, धम्माल, मजा, मस्ती करणारे पर्यटक़. पण कधी कल्पना केलीय का? ...
गोव्यात पार पडले युवी-हेजलच्या लग्नाचे पारंपारिक विधी!
गोवा म्हटलं की, डोळ्यासमोर येतं निसर्गसंपन्न वातावरण, नयनरम्य बीचेस, धम्माल, मजा, मस्ती करणारे पर्यटक़. पण कधी कल्पना केलीय का? समुद्रकिनारी फुलांचा मंडप उभारलेला.. लग्नाचे पारंपारिक विधी पूर्ण करताना वर-वधू..शुभेच्छा, आशीर्वाद देणारे आप्तेष्ट, मित्रमंडळ... असेच काहीसे स्वप्नवत चित्र युवराज सिंग आणि हेजल कीच यांच्या लग्नावेळी पहावयास मिळाले. दिल्लीत ३० डिसेंबरला झालेल्या लग्नाच्या विधीपेक्षाही ग्रँड आणि सुंदर अशी सजावट, विधी गोव्यात पार पडले. यावेळी विराट कोहली, एस.एस.धोनी, इतर क्रिकेटर्स आणि बॉलीवूडमधील काही तारे-तारका उपस्थित होते. या विधीचे काही फोटो खास तुमच्यासाठी : * थाटमाट : हिंदु संस्कार आणि विधींनुसार होणाऱ्या लग्नांचा थाटच काही और असतो. गोव्यात युवराज सिंग आणि हेजल कीच यांनीही महाराष्ट्रीयन पद्धतीने अग्नीच्या साक्षीने सात जन्म एकमेकांसोबत संसार करण्याची वचनं दिली. * बाईकवरून एन्ट्री : ‘कुर्ता-पायजमा’, ‘हाफ जॅकेट’ आणि गोल्डन-ब्राऊन रंगाचे सनग्लासेस घातलेला युवराज या लग्नाकार्यावेळी सर्वांच्या उत्सुकतेचा भाग बनला. यावेळी मस्तपैकी बँड बोलावण्यात आला. युवीने खास त्याच्या स्टाईलमध्ये बाईकवरून एन्ट्री केली. * डॅशिंग ‘वर’ : लग्न म्हटल्यावर वर हा हॅण्डसम, गुड लुकिंग दिसलाच पाहिजे. अगदी तसाच युवीही त्याच्या कुर्ता -पायजमा ड्रेसिंगमध्ये अतिशय डॅशिंग दिसत होता. * यारों के साथ : भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांच्यासोबत युवीने फोटोसेशन केले. रोहितला झालेल्या दुखापतीमुळे तो टीमपासून थोडा दूरच होता. मात्र, त्याला गोव्यात मित्राच्या लग्नासाठी येण्याचा मोह काही आवरता आला नाही. * सूर्याच्या साथीने : सूर्य मावळतीला जात असतांना युवराजने हेजलच्या कुटुंबियांसमवेत काही विधी पूर्ण केले. गोव्यातील ही लग्नाची स्थळे युवराज-हेजलने ठरवलेली आहेत. * मित्र-आप्तेष्टांसह : युवराज सिंगचा मॅनेजर अनीश गौतम सोबत रोहित शर्मा आणि रितीका सजदेह. * अनुष्का-विराटची हजेरी : रोहित शर्मा, रितीका सजदेह, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी लग्नाला हजेरी लावली. विराट आणि अनुष्का यांनी दिल्लीहून प्रस्थान करून गोव्यात मित्र युवराजच्या लग्नासाठी उपस्थिती नोंदवली.