Join us

तैमूूरने मामा रणबीर कपूरसोबत सेलिब्रेट केला पहिला ख्रिसमस, पाहा फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST

अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करिना कपूर-खान यांचा चिमुकला तैमूर बी-टाउनमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्टार किड्सपैकी आहे. गेल्या २० डिसेंबर रोजी पतौडी परिवाराच्या या वारसाने त्याचा पहिला वाढदिवस साजरा केला. त्यासाठी संपूर्ण पतौडी पॅलेज रोषणाईने झळाळून गेले होते. आता तैमूरने त्याचा पहिला ख्रिसमस सेलिब्रेट केला असून, मामा रणबीर कपूरसोबत त्याने चांगलीच धमालमस्ती केली, पाहा त्याचे काही फोटो !

अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करिना कपूर-खान यांचा चिमुकला तैमूर बी-टाउनमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्टार किड्सपैकी आहे. गेल्या २० डिसेंबर रोजी पतौडी परिवाराच्या या वारसाने त्याचा पहिला वाढदिवस साजरा केला. त्यासाठी संपूर्ण पतौडी पॅलेज रोषणाईने झळाळून गेले होते. आता तैमूरने त्याचा पहिला ख्रिसमस सेलिब्रेट केला असून, मामा रणबीर कपूरसोबत त्याने चांगलीच धमालमस्ती केली, पाहा त्याचे काही फोटो !सोमवारी पहिल्यांदा तैमूर त्याच्या मम्मी-पापाचा हात पकडून चालत असताना कॅमेºयात कैद झाला.ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी करिना आणि सैफ दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या घरी गेले होते. त्यावेळी तैमूरने चांगलीच धमाल मस्ती केली.या ख्रिसमस पार्टीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये तैमूर खूपच क्यूट दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये तैमूरने काळा चष्मा परिधान केला आहे, तर दुसºया व्हिडीओमध्ये तो डान्स करताना दिसत आहे.या पार्टीतील बरेचसे इनसाइड फोटो समोर आले आहेत. मात्र तैमूरचा मामा रणबीरसोबतचा फोटो सर्वात स्पेशल ठरला आहे.या फोटोमध्ये दोघेही खूपच क्यूट दिसत आहेत. दोघांची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. हे फोटो रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी शेअर केले आहेत.