‘ये ढाई किलो का हाथ है, ये हाथ अगर किसी पे उठा ना, आदमी उठता नहीं, उठ जाता है’ या डायलॉगने संपूर्ण जगातच झिंगाट निर्माण केला. या डायलॉगची बातच कोई और है. पण हा डायलॉग ज्या अभिनेत्यामुळे जगातील प्रत्येक कोपºयापर्यंत पोहोचविला, अशा या पाजीचा म्हणजे प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सनी देओल याचा आज ५९ वाढदिवस. अशा या सुंदर क्षणी लोकमत सीएनएक्सने सनी देओल विषयी माहिती नसलेल्या खास गोष्टींचा घेतलेला हा आढावा.
१. बॉलिवूडचा तगडा अभिनेता सनी देओल हा इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करताच त्याच्या अफेअरची चर्चा चालू होती. त्याची बॉलिवूडची सुरूवातच म्हटली तर त्याच्या अफेअरने रंगली होती. त्याचा पहिला चित्रपट हा ‘बेताब’ होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अमृता सिंह झळकली होती. बेताबच्या या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली.
२. बेताब या चित्रपटामुळे दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. आॅनस्क्रीन तर ही जोडी खूपच गाजली. पण आॅफस्क्रीनही सनी आणि अमृता एकमेकांना वारंवार भेटताना दिसले. तसेच या चित्रपटातील इंटीमेंट सीन देखील प्रेक्षकांना त्यावेळी भावला होता. त्यांचा हा रील लाइफ रोमांन्स रियल लाइफदेखील बनला होता.
३. अभिनेत्री अमृताचे सनीवर खूप प्रेम होते. पण सनी मात्र पूर्ण जगासमोर हे नाते मान्य करण्यास तयार नव्हता. कारण या अभिनेत्यावर फॅमिलीची जबाबदारी असल्यामुळे तो या नात्यावर खुल्यापणाने बोलत नव्हता. तर दुसरीकडे अमृता सिंहच्या आईला देखील हे नातं मान्य नव्हतं.
४. सनी देओलचे नुकतेच करिअर सुरू झाले होते. त्यामुळे अशा अफेअरच्या चर्चेमुळे अभिनेत्री अमृता हिने सनीची चौकशी करण्यास सुरूवात केली. पण चर्चेदरम्याने तिला समजले की, लंडनमध्ये राहणाºया पूजा नावाच्या मुलीसोबत सनीचे अफेअर होते.
५. अमृता सनीच्या प्रेमात खूप वेडी होती. म्हणून तिने पहिल्यांदा पूजाच्या नात्यांवर विश्वास ठेवला नाही. तसेच सनी देओलचे लग्नही पूजासोबत झाले होते. पण हे मान्य करण्यास अमृता तयार नव्हती. हा अभिनेता कामाच्या निमित्ताने नेहमी लंडनला जात असे. एवढेच अमृताला माहित होते. त्यावेळी ही अभिनेत्री देखील भारतात सनीच्या चित्रपटांच्या मिटींग्स अटेंड करीत असे.
६. ज्यावेळी अमृताला या सर्व गोष्टींवर विश्वास बसला होता. त्यावेळी ती खूप अवाक झाली. कारण सनीने व त्याच्या परिवाराने ही गोष्ट लपून ठेवली होती. सनीचे बॉलिवूड करिअर नुकतेच सुरू झाले होते. तर दुसरीकडे पूजाल ही अमृता व सनीच्या नात्यांबद्दल काही माहिती नव्हते.
७. पूजा व सनी यांचे नाते बिझनेसमुळे निर्माण झाले होते. या दोघांची फॅमिली एका बिझनेस अॅग्रीमेंटमुळे एकमेकांना ओळखत होते. हेच नाते लग्नाच्या नात्यात बदलले होते. फक्त बॉलिवूड करिअरमुळेच सनीचे पूजासोबतचे लग्न जगासमोरून लपविण्यात आले होते.
८. प्रेक्षक सनीला एक रोमान्स हिरो म्हणून खूप भरभरून प्रेम करत होते. मात्र सनीला भीती होती की, जर प्रेक्षकांना लग्नाची गोष्ट कळाली, तर प्रेक्षक मला एका रोमान्स हिरोप्रमाणे प्रेम करणार नाहीत. त्याची प्रसिद्धी त्याच्यापासून दुरावली जाईल.
९. एक ना एक दिवस सत्य बाहेर येतेच. फायनली सनीच्या लग्नाची बातमी पेपरमध्ये झळकली. पण तरीही सनी लग्न झाले ही गोष्ट मान्य करण्यास तयार नव्हता. तोप़र्यत सनी आणि अमृता यांचे नातेही संपुष्टात आले होते.
१०. सनी देओलच्या आयुष्यातील हीे वळणं इथेच थांबली नाही. अमृतानंतर ही सनीच्या आ़युष्यात अभिनेत्री डिंपल कपाडिया आली. या अभिनेत्रीवर सनी देओल खूपच प्रेम करत होता. कोणत्याही क्षणी तो डिंपलपासून लांब जाण्यास तयार नव्हता. तसेच या दोघांनी लग्नही केल्याचे सांगण्यात येत होते, पण त्यांच्या लग्नाचा कोणताही पुरावा नव्हता. त्यांचे हे नाते ११ वर्षे टिकून होते. पण एवढया वर्षानंतर या दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले.
अशा पद्धतीने सनीचे आ़युष्य हे खूप वळणाचे ठरले. त्याची ही प्रेमकथा खूपच रंगली. पुढे तो रवीनासोबत ही चर्चेत राहिला होता. सनीची ही प्रेमकथा प्रेक्षकांना जाणून नक्कीच धक्का बसेल असे आहे.