Join us

हे स्टार किड्स २०१८ मध्ये झळकणार चित्रपटांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST

२०१८ मध्ये अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. काहीजणांनी तर त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवातदेखील केली आहे.

२०१८ मध्ये अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. काहीजणांनी तर त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवातदेखील केली आहे. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर धडक या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.निलिमा आझमी आणि राजेश खत्तर यांचा मुलगा इशान खत्तर धडक या चित्रपटात झळकणार आहे. इशान हा शाहिद कपूरचा लहान भाऊ आहे.शाहरुख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे.चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे स्टुंडट ऑफ द इयर २ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे.सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी साजिद नाडियाडवालाच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे.गदर या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा त्याच्या वडिलांच्याच जिनियस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.सनी देओलचा मुलगा करण देओल पल पल दिल के पास या चित्रपटात पुढील वर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून या चित्रपटाची निर्मिती देओल प्रोडक्शन हाऊसच करणार आहे तर चित्रपटाचे दिग्दर्शन सनी करणार आहे.