टिस्काच्या ‘चटनी’ ला नेटिझन्सची सर्वाधिक पसंती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 18:13 IST
शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित वाटेल की, टिस्का चोप्रा हिने आता काय चटणी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला की काय? तसे ...
टिस्काच्या ‘चटनी’ ला नेटिझन्सची सर्वाधिक पसंती!
शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित वाटेल की, टिस्का चोप्रा हिने आता काय चटणी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला की काय? तसे नसून तिच्या आगामी शॉर्टफिल्मचे नाव ‘चटणी’ असे आहे. या शॉर्टफिल्मच्या ट्रेलरला इंटरनेटवर नेटिझन्सनी सर्वाधिक पसंती नोंदविली आहे. याबाबतीत टिस्का म्हणते,‘मी एक लेखक म्हणून काही काम करू शकते, हा विचार करूनच मला खूप थ्रिलींग फिल येतो आहे. याअगोदर मी कधी लेखक होण्याचा विचार केला नाही. अभिनय करणं काही फार मोठं काम नाही. मी तर ते देखील करतेच आहे ना!’ टिस्का चोप्रा ही भूमिकांना समजून घेणारी अभिनेत्री आहे. चित्रपटातील तिचा गाझियाबादी लूक आणि तिचे संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘हमको क्या पता, हम तो गाझियाबाद से हैं...’ हा डायलॉग तर फार प्रसिद्ध झाला आहे. दिल्लीच्या चांदणी चौकमध्ये शॉटफिल्मची शूटिंग झाली असून, फिल्मचा प्लॉट डार्क आहे. सध्याचा प्रेक्षकवर्ग हा चांगल्या कथानकासाठी तयार आहे. त्यामुळे अशा कथांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. स्त्री कलाकारांसाठी सध्याचा काळ खूपच सुखावह आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधील स्त्री भूमिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या शार्टफिल्ममध्ये टिस्काच्या सहकलाकार रसिका दुग्गल आणि आदिल हुसैन यांच्याही अभिनयाचे कौतुक झाले. फिल्मचा ट्रेलर आणि गाण्यांना सोशल साईटवर मिळणारी पसंती पाहता टिस्का चांगलीच आश्चर्यचकित झाली आहे. तिला आता अनेक विषयांवर शॉर्टफिल्म लिहिण्यासाठी या माध्यमातून जणू प्रोत्साहनच मिळाले आहे.