Join us  

शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी सिंघु बॉर्डरला पोहोचली स्वरा भास्कर, फोटो झाले व्हायरल....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 1:10 PM

1 / 11
शेतकरी आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी सपोर्ट केला आहे. अनेकांनी त्यात थेट सहभागही घेतला आहे. तर अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनात सहभागी होत आहेत. आता सुरूवातीपासून या आंदोलनाला पाठिंबा देणारी अभिनेत्री स्वरा भास्कर थेट सिंघु बॉर्डरवर जाऊन आली.
2 / 11
अभिनेत्री स्वरा भास्कर सिंघु बॉर्डरवर पोहोचली होती. सिंघु बॉर्डर शेतकरी आंदोलनाचं एक मोठं केंद्र बनलं आहे. इथे जाऊन तिने बराच वेळ काढला आणि तिथे बसलेल्या शेतकऱ्यांची हिंमतही वाढवली.
3 / 11
सोशल मीडियावर स्वरा भास्करने काही फोटो शेअर केले आहेत. तिने शेतकऱ्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. तिने ट्विट करत शेतकऱ्यांच्या हिंमतीचं कौतुक केलं आहे.
4 / 11
स्वराने ट्विटमध्ये लिहिले की, शेतकऱ्यांची हिंमत, त्यांचा दृढ निश्चय बघून फार चांगलं वाटलं. हा दिवस चांगला गेला.
5 / 11
सिंघु बॉर्डरला पोहोचण्याआधी स्वराने अनेकदा ट्विट करत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर तिने टिकाही केली आहे.
6 / 11
या मुद्द्यावरून स्वरा भास्करचा कंगना रणौतसोबत वादही झाला होता. कंगनाने केलेली वक्तव्ये स्वराला अजिबात पसंत पडली नव्हती. ती कंगनाला उद्देशून असंही म्हणाली होती की, चांगला कलाकार हा चांगला माणूस असेलच असं गरजेचं नसतं.
7 / 11
स्वरा भास्कर येण्याआधी गायक दिलजीत दोसांज आणि गुरदास मानसारखे मोठे सेलेब्स शेतकऱ्यांच्या आंदोलनात येऊन गेले आहेत.
8 / 11
9 / 11
10 / 11
11 / 11
टॅग्स :स्वरा भास्करदिल्लीशेतकरी संप