By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:21 IST
1 / 9बॉलिवूड कलाकार कायमच त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइमुळेही चर्चेत येत असतात. यात खासकरुन त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि संपत्तीची चर्चा होते. सध्या अशीच चर्चा अभिनेता सुनील शेट्टीच्या पत्नीची होत आहे.2 / 9आपल्या अभिनयामुळे सुनील शेट्टीने गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र, आता त्याचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.3 / 9सुनील शेट्टीचा कलाविश्वातील वावर जरी कमी झाला असला तरीदेखील तो अन्य क्षेत्रांमध्ये सक्रीय आहे. इतकंच नाही तर त्याची पत्नी प्रत्येक टप्प्यावर त्याला साथ देत आहे.4 / 9सुनील शेट्टीच्या पत्नीचं नाव माना शेट्टी असं असून तिला बॉलिवूडमधील लेडी अंबानी म्हटलं जातं.5 / 9माना बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्त्री म्हणून ओळखली जाते.6 / 9माना एक बिझनेस वूमन असून तिने कलाविश्वात तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे घर आणि व्यवसाय या दोघांचा ती बरोबर समतोल राखते.7 / 9माना आणि सुनील शेट्टी यांनी मिळून S2 हा रिअल इस्टेट प्रोजेक्ट सुरु केला होता. या प्रोजेक्ट अंतर्गत त्यांनी मुंबईत २१ लक्झरी विला उभारले आहेत. 8 / 9मानाचं एक लाइफस्टाइल स्टोरदेखील आहे. यात डेकोरेशनपासून ते दैनंदिन जीवनात लागणाऱ्या काही लक्झरी वस्तूही सहज उपलब्ध होतात.9 / 9माना 'सेव द चिल्ड्रन इंडिया' ही एनजीओदेखील चालवते. तसंच सुनील शेट्टीचं एक प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. त्यामुळे ही नवरा-बायकोची जोडी वर्षाला कोटयवधींची कमाई करतात.