Join us  

Ahan Shetty : सुनील अण्णाची होणारी सूनबाई दिसते फारच सुंदर, अहान शेट्टीची गर्लफ्रेन्ड तुम्ही पाहिलीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 2:08 PM

1 / 10
बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी नुकतीच क्रिकेटपटू के एल राहुलसोबत लग्नबंधनात अडकली. आता अथियाच्या लग्नानंतर चर्चा आहे ती सुनील शेट्टीच्या होणाऱ्या सूनबाईची.
2 / 10
होय, सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी दीर्घकाळापासून तानिया श्रॉफला डेट करतोय. तानिया व अहान शाळेच्या दिवसांपासूनचे मित्र आहेत. आता हे नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं आहे.
3 / 10
२०१५ साली अहान व तानिया रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत आले होते. यानंतर एका पोस्टमध्ये अहानने आय लव्ह यू म्हणत जाहीरपणे तानियावरच्या प्रेमाची कबुली दिली होती.
4 / 10
अरमान जैनच्या लग्नात अहान व तानिया दोघंही पहिल्यांदा कपल म्हणून पब्लिकली दिसले. आता तर हे कपल अनेकदा एकत्र फिरताना, डिनर डेट, व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतं.
5 / 10
अहानच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तानियासोबतचे अनेक रोमॅन्टिक फोटो पाहायला मिळतात. तानियाच्या अकाऊंटवरही अहानचे फोटो आहेत.
6 / 10
अहानची गर्लफ्रेन्ड तानिया श्रॉफ ही बिझनेसमॅन जयदेव श्रॉफ यांची मुलगी आहे. जयदेव हे युपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ आहेत.
7 / 10
तानियाने अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. अर्थात तिचं बालपण मात्र मुंबईत गेलं.
8 / 10
तानिया लंडन स्कूल ऑफ फॅशनमधून फॅशन डिझाईनिंगचा कोर्स करतेय. तानिया केवळ ७ वर्षांची असताना तिचे आई-वडिल जयदेव आणि रोमिला एकमेकांपासून विभक्त झालेत.
9 / 10
अहानने साजीद नाडियाडवालाच्या ‘तडप’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यावेळी सेटवर तानिया अहानसोबतच असायची.
10 / 10
तडप रिलीज झाला तेव्हा तिने अहानसाठी स्पेशन पोस्ट शेअर करत त्याला सपोर्ट केला होता. ती त्याची सर्वात मोठी चीअरलीडर आहे.
टॅग्स :अहान शेट्टीसुनील शेट्टीअथिया शेट्टी बॉलिवूड