Join us

अवॉर्ड सोहळ्यात तारे-तारका चमकल्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST

मुंबईत अलीकडेच पार पडलेल्या ‘झी सिने अ‍ॅवॉर्ड्स-२०१७’ सोहळ्यात बॉलिवूडच्या सर्व तारे-तारकांनी उपस्थिती नोंदवली. यावेळी प्रत्येक सेलिब्रेटी त्याच्या हटके अंदाजात येथे आलेला दिसला.

मुंबईत अलीकडेच पार पडलेल्या ‘झी सिने अ‍ॅवॉर्ड्स-२०१७’ सोहळ्यात बॉलिवूडच्या सर्व तारे-तारकांनी उपस्थिती नोंदवली. यावेळी प्रत्येक सेलिब्रेटी त्याच्या हटके अंदाजात येथे आलेला दिसला. ‘आॅल टाईम हॉट’ सनी लिओनी या सोहळयात तिचा पती डेनियल वेबर याच्यासह आली होती. ती अशा हॉट अवतारात येथे आलेली दिसली.अभिनेत्री आलिया भट्ट या सोहळ्याला अतिशय सुंदर अशा साडीच्या पेहरावात आली होती. सध्या ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपट रिलीज झाला असला तरीही ती प्रमोशनमध्ये बिझी आहे.अभिनेता गोविंदा हा अतिशय कॅज्युअल लुकमध्ये आलेला दिसला. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट ‘आ गया हिरो’ मुळे चर्चेत आहे.अभिनेत्री हुमा कुरेशी हिने अ‍ॅवॉर्ड सोहळ्यात तिच्या अशा आगळ्यावेगळ्या ढंगात एन्ट्री घेतली. तिचा असा अंदाज पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल नाही का?‘दबंग गर्ल’ फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यांचा असा हॉट अंदाज पाहिल्यावर कुणीही घायाळ होईल...!‘बागी’ फेम अभिनेता टायगर श्रॉफ याने डॅशिंग लुकमध्ये या सोहळ्यात एन्ट्री घेतली. त्याचा असा रूबाबदार लुक एकदा पाहाच...!मराठी सिनेजगतानेही या सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेता आकाश ठोसर यानेही अशा रॉयल अंदाजात उपस्थिती नोंदवली.‘हॅण्डसम-हंक’ वरूण धवन याने अशा डॅशिंग अंदाजात सोहळ्याला उपस्थिती नोंदवली.‘बंगाली बाला’ अभिनेत्री विद्या बालन ही आॅफव्हाईट रंगाच्या साडीत येथे आली होती. तिचा हा सुंदर पेहराव सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.मराठी जगतातील ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेही पांढºया रंगाच्या अशा कॉस्च्युममध्ये येथे एन्ट्री घेतली. पाहा तिची ही हॉट अदा.मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने घातलेला हा वेस्टर्न प्रकारातील ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता जितेंद्र जोशी म्हणजेच आपला लाडका जितूचा असा अंदाज तुम्ही याअगोदर कधी पाहिला नसेल!अनुष्का शर्मा ही काळ्या रंगाच्या ड्रेसिंगमध्ये सोहळ्याला हजेरी लावली होती. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड विराट क ोहलीही आला होता.दिग्दर्शक सुभाष घई हे या सोहळ्याला आवर्जून आले होते.अभिनेत्री गौहर खान हिने या सोहळयाला पांढºया रंगाच्या ड्रेसमध्ये हजेरी लावली होती. तिचा हा हॉट अंदाज कुणापासून लपून राहिला नाही.अभिनेत्री रवीना टंडन हिने तिच्या हॉट अंदाजात सोहळ्याला हजेरी लावली. बॉलिवूडपासून गेल्या काही वर्षांपासून दूर असली तरीही तिने तिचे सौंदर्य अजून असे टिकवून ठेवले आहे.‘मिर्झियाँ’ चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री सैयामी खेर ही गुलाबी रंगाच्या ड्रेसिंगमध्ये सोहळयात आली होती. या चित्रपटामुळे तिला अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली.