Spotted! सारा अली खानच्या घराबाहेर काय करतोय हर्षवर्धन कपूर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 13:02 IST
सारा अली खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. पण फक्त चर्चाच. कारण अद्याप साराने बॉलिवूड डेब्यू ...
Spotted! सारा अली खानच्या घराबाहेर काय करतोय हर्षवर्धन कपूर?
सारा अली खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. पण फक्त चर्चाच. कारण अद्याप साराने बॉलिवूड डेब्यू केलेला नाही. पण बॉलिवूड डेब्यू करण्याआधीच सारा तिच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या अन् हर्षवर्धन कपूरच्या लिंकअपच्या बातम्या येत आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झालेत. कधी डिनर डेटचे फोटो तर कधी सोशल मीडियावरच्या या दोघांच्या पोस्ट पाहता दोघेही एकमेकांना डेट करत आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण काल रात्री जे झाले, ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.होय, काल रात्री हर्षवर्धन अमृता सिंह हिच्या घरातून बाहेर निघताना दिसला. आता अमृता सिंह हिच्या घरातून हर्षवर्धन बाहेर पडतोय, म्हणजे नक्कीच तो साराला भेटायला आला असणार. हर्षवर्धन साराच्या घरापर्यंत पोहोचला म्हणजे, नक्कीच अमृता सिंहने या दोघांच्या नात्यावर संमतीची मोहोर लावलेली असू शकते. ALSO READ : SEE PIC : बॉलिवूडच्या आयटम गर्लसोबत वर्कआउट करताना दिसली सारा अली खान!हर्षवर्धनबद्दल खरे तर वेगळी ओळख देण्याची गरज नाही. पण तरिही ज्यांना माहित नाही, त्यांच्यासाठी सांगायचे तर हर्षवर्धन हा अनिल कपूरचा मुलगा आहे. ‘मिर्झिया’द्वारे बॉलिवूड डेब्यू करणारा हर्षवर्धन सध्या ‘भावेश जोशी’ या चित्रपटात व्यस्त आहे. सैय्यामी खेर या हिरोईनसोबत हर्षवर्धनचे ‘मिर्झिया’द्वारे ग्रँड लॉन्चिंग करण्यात आले होते. पण हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. राहिली गोष्ट साराची तर सारा ही सैफ अली खान आणि त्याची एक्स वाईफ अमृता सिंह यांची मुलगी आहे. सारा करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ दी इअर’मधून बॉलिवूड डेब्यू करणार, आधी अशी चर्चा होती. पण आता ती सुशांत सिंह राजपूतसोबत ‘केदारनाथ’मध्ये दिसणार, अशी खबर आहे. अर्थात अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.