Join us

​सोनम कपूरचे अवतरली डिजीटल स्टिकरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 21:21 IST

बालिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिच्यासाठी मागील वर्ष तिच्या करिअरमधील सर्वांत चांगले ठरले होते. २०१७ हे वर्ष देखील सोनमसाठी चांगली ...

बालिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिच्यासाठी मागील वर्ष तिच्या करिअरमधील सर्वांत चांगले ठरले होते. २०१७ हे वर्ष देखील सोनमसाठी चांगली सुरुवात करणारे ठरले आहे. नुकताच सोनमला लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. या अवॉर्डनंतर तिने आपले डिजीटल स्टिकर लाँच केले आहे. डिजीटल स्टिकर असणारी सोनम पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. काही वर्षांपूर्वी सोनमचा अँग्री बर्ड अवतार तुम्हाला पहायला मिळाला होता. पृथ्वीच्या संरक्षणार्थ राबवण्यात आलेल्या एका उपक्रमासाठी तिने हा लूक केला होता. बॉलिवूडमध्ये स्टाईल आयकॉन नावाने सोनमला ओळखले जाऊ लागले आहे. अशातच सोनम कपूर हिने स्वत:चे डिजिटल स्टिकर आणले आहे. या डिजिटल स्टिकर सोनमने आतापर्यंत साकारलेल्या विविध भूमिकांच्या रुपात बनवण्यात आले आहेत. असे हे बहुरंगी आणि बहुढंगी डिजिटल स्टिकर लवकरच प्रदर्शित केले जाणार असून सोनमच्याच सिग्नेचर अ‍ॅपवर ते उपलब्ध उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोनम ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे जिचे स्वत:चे अ‍ॅप लॉन्च झाले आहे. सोनमचे डिजीटल स्टिकर ‘आय हेट लव स्टोरी‘, ‘आयशा’, ‘नीरजा‘, ‘डॉली की डोली’ आणि ‘खूबसूरत’ या चित्रपटांत सोनमने भूमिकांपासून या डिजिटल स्टिकरची प्रेरणा घेण्यात आली आहे. आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच सोनम सोशल मीडियावर जोडलेली असते. ती इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारखे नेटवर्किंग साइटवर फार सक्रीयही असते. नुकताच सोनमला नीरजा या चित्रपटासाठी फिल्मफेअर क्रिटिक्स अक्लेम्ड बेस्ट अ‍ॅक्टरचा अवॉड देण्यात आला होता. या अवॉर्डनंतर अनिल कपूर यांनी आपल्या मुलीला शाबसकी देणारी पोस्ट फेसबुकवरून केली होती.