‘राणी नागमती’ अनुप्रिया गोयंकाचे काही खास फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत एक फारसा चर्चेत नसलेला चेहराही दिसणार आहे. हा चेहरा कोण तर, अनुप्रिया गोयंका हिचा.
‘राणी नागमती’ अनुप्रिया गोयंकाचे काही खास फोटो!
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत एक फारसा चर्चेत नसलेला चेहराही दिसणार आहे. हा चेहरा कोण तर, अनुप्रिया गोयंका हिचा.‘पद्मावती’त अनुप्रिया दीपिका पादुकोणची ‘सौतन’ बनणार आहे. होय, म्हणजेच, अनुप्रिया यात महारावल रतन सिंगची पहिली पत्नी राणी नागमतीची भूमिका साकारणार आहे. अनुप्रियाने एका जाहिरातीत लेस्बियनची भूूमिका साकारली होती. तिच्या या जाहिरातीवरून बरेच वादळ माजले होते. अनुप्रियाने अनेक जाहिराती व लघूपटात काम केले आहे. ३० वर्षांची अनुप्रिया पेशाने मॉडेल आहे. २०१३ मध्ये तिने ‘पोतुगाडू’ या तेलगू चित्रपटातून अॅक्टिंग डेब्यू केला होता. यानंतर ती बॉलिवूडमध्येही दिसली. ‘पाठशाला’,‘बॉबी जासूस’, ‘डॅडी’ आणि ‘ढिशूम’मध्ये अनुप्रियाने काम केलेयं. अर्थात हे चित्रपट अनुप्रियाला मोठी ओळख देऊ शकले नाहीत. पण आता दीपिकाची ‘सौतन’ बनून अनुप्रिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.