Join us  

लैंगिक शोषणाची बळी ठरली होती नेहा भसीन, घटना आठवून आजही होते अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 6:00 AM

1 / 10
इंडस्ट्रीत तिने आपले स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. नेहा भसीन आता चर्चेत येण्यास एक वेगळेच कारण समोर आले आहे.
2 / 10
दिवसेंदिवस आपण लैंगिक अत्याचाराच्या बातम्या वाचत असतो. अभिनय क्षेत्रात काम करत असताना अनेक कलाकारांनीही या विषयी अनेकदा वाचा फोडली आहे.
3 / 10
या विषयावर पूर्वी इतके मनमोकळेपणाने बोलले जायचे नाही. मात्र आता अनेकजण त्यांना आलेल्या विचित्र अनुभवाविषयी उघडपणे बोलतात.
4 / 10
नेहा भसीननेही या विषयी दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादाक खुलासा केला आहे.
5 / 10
अवघ्या 10व्या वर्षी नेहाला लैंगिक शोषणाचा सामना कराला लागला होता.
6 / 10
लहानपणी हरिद्वार याठिकाणी गेली असता तिच्यासोबत असा प्रसंग घडला असल्याचे तिने म्हटले आहे.
7 / 10
आजही त्या घटना आठवताच अस्वस्थ व्हायला होते.
8 / 10
एका मुलीसाठी या चित्रपटसृष्टीत टिकून राहणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. मात्र मला माझा स्वतःवर खूप विश्वास आहे.
9 / 10
हाच विश्वास मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी कायम मदत करतो. कधीही मला आत्मविश्वास ढळतो असं वाटतं त्यावेळी मी मनःशांती, ध्यान करते आणि लिखाणही करते. त्यामुळे मला लिहायलाही खूप आवडतं.
10 / 10
दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या समाजात असे काही लोक आहेत की त्यांच्याकडे पाहून आपुसकच प्रेरणा मिळते.
टॅग्स :नेहा भसीन