दंगल आणि सुलतान या दोन चित्रपटात आहेत ही साम्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 13:00 IST
दंगल हा चित्रपट प्रदर्शित होऊन काहीच दिवस झाले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ...
दंगल आणि सुलतान या दोन चित्रपटात आहेत ही साम्य
दंगल हा चित्रपट प्रदर्शित होऊन काहीच दिवस झाले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सुलतान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. दंगल आणि सुलतान हे दोन्ही चित्रपट हे कुस्तीवर आधारित आहेत. त्यामुळे या दोन्ही चित्रपटात खूप साम्य पाहायला मिळतेय. सुलतान या चित्रपटात सलमानने वापरलेली स्कूटर खूपच गाजली होती. दंगलमध्येदेखील काहीशा अशाचप्रकारच्याच स्कूटरवर आपल्याला आमिरला पाहायला मिळतंय. आमिरने त्यावेळी काहीसे कपडेदेखील सलमानसारखेच घातलेले आहेत. सुलतान या चित्रपटात सलमानचे सुटलेले पोट तुम्हाला आठवत असेलच. हे पोट पाहून त्याला चांगलेच रडू कोसळले होते. दंगलमध्येदेखील अनेक दृश्यांमध्ये आपल्याला आमिरचे सुटलेले पोट पाहायला मिळते. सुलतान आणि दंगल या दोन्ही चित्रपटात आमिर आणि सलमान या दोघांचाही हा सेम पोजमधला फोटो आहे. सुलतान आणि दंगलमध्ये महिला कुस्ती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.